Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या सिम्बॉयसिस महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निलंबन करून गुन्हा दाखल करण्यासाठी अभाविप चे आंदोलन

पुणे: सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स मधील प्राध्यापकाने हिंदू देवी देवतांबद्द्ल आक्षेपार्ह वक्तव्य करून विद्यार्थ्यांमध्ये द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या विरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित कॉलेज समोर आंदोलन करून निषेध नोंदवला.

सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये हिंदी विषय शिकवणारे प्राध्यापक अशोक डोले वर्गात शिकवताना कायम हिंदू देवी देवतांचा अपमान होईल असे वक्तव्य करत होते. मात्र, दि. २५ जुलै २०२३ ला जेव्हा त्यांनी पुन्हा हिंदू देवी देवतांचा अपमान होईल असे वक्तव्य केले त्यावेळी वर्गातील विद्यार्थ्याने त्याचे चित्रिकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश दाखवला. ज्यावेळी सिम्बॉयसिस कॉलेज मधील विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे कडे हा विषय घेऊन आले त्या वेळी अभाविप च्या कार्यकर्त्यांनी सिम्बॉयसिस प्रशासनाशी भेटून चर्चा केली, मात्र संबंधित प्राध्यापकावर कार्यवाही करून त्यांच्या निलंबनासाठी ७ दिवसांचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. मात्र, असे झाले नाही.

घडलेल्या घटनेची गंभीरता लक्षात घेता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगर च्या कार्यकर्त्यांनी आज दि. ३ ऑगस्ट ला दुपारी १ वाजता सिम्बॉयसिस कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स च्या समोर आंदोलन करून निषेध नोंदवला.
यावेळी अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे म्हणाले की, “पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, येथे विविध ठिकाणांहून विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशोक डोले सारखे प्राध्यापक चुकीच्या प्रवृत्ती ने काम करतात, विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचे प्रयत्न करतात, हे अतिशय लज्जास्पद आहे, विद्यार्थी परिषद हे मुळीच सहन करणार नाही. प्राध्यापकाच्या भूमिकेत असल्यास आपल्या वर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची एक जबाबदारी असते, जर प्राध्यापकच समाजात असे तेढ निर्माण करण्याचे कार्य करत असतील तर यावर प्रशासनाने लवकरच आळा घालायला हवा. संबंधित प्राध्यापकाचे निलंबन तर व्हायलाच हवे, मात्र त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अभाविप ने केली आहे”.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading