पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संत स्वरूप चित्र साकारून केले आगळेवेगळे स्वागत
पुणे : देहू येथील प्रसिद्ध चित्रकार प्रेम माने हे आपल्या चित्रकलेतून आगळेवेगळे चित्र नेहमीच काढत असतात पंतप्रधान. नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचं स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने लोक करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संत स्वरूप चित्र साकारून आगळेवेगळे स्वागत चित्रकार प्रेम माने यांनी केले आहे देशात नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या देशाची ‘ वसुधैव कुटुंबकम ‘ ही संकल्पना राबवून सर्व लोक हे एकच आहेत ही बाब नरेंद्र मोदी करीत असून आपल्या देशाची मान जगात उंचावत आहेत या बाबीचं कौतुक करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून मला मिळालेल्या चित्रकलेतून त्यांचं संतस्वरूप चित्र काढून त्यांचं स्वागत करीत असल्याची माहिती चित्रकार प्रेम माने यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे प्रेरणास्थान असून त्यांचं स्वागत करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने त्याचं स्वागत करावं असं देखील आवाहन चित्रकार प्रेम माने यांनी केले
