मनोहर उर्फ संभाजी भिडेंच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने
पुणे : मनोहर उर्फ संभाजी भिडे याने राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिराव फुले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू , व समाजसुघारक यांच्याबाबतीत केलेल्या गैरवक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करुन निषेध करण्यात आला. भिडे याला या अवमानकारक वक्तव्याबद्दल अटक करुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना दिपक मानकर म्हणाले भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी हे शेवटच्या श्वासापर्यंत या देशासाठी लढले या राष्ट्रपित्याचा अपमान आपण कोणीही सहन करू शकत नाही , संभाजी भिडे याचे खरे नाव मनोहर भिडे. हे असून ही व्यक्ती संभाजी हे नाव लावून जनतेची का फसवणूक करते याचा शोध धेणे निश्चितच गरजेचे आहे , सदर व्यक्तीस त्वरीत अटक व्हावी याकरीता आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत ह्यास त्वरीत अटक न झाल्यास आम्ही सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत .
याप्रसंगी बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले की, संभाजी भिडे याला राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत अवमानकारक वक्तव्ये करण्याची खोड आहे. ही वक्तव्ये जाणिवपूर्वक केली जात असून याम माध्यमातून दोन समाजामध्ये दंगली घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाने याची अतिशय गंभीर अशी दखल घेऊन संभाजी भिडे याच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
ते पुढे म्हणाले की, हा देश घडविणाऱ्या विचारधारेचा सतत अवमान करण्याची प्रवृत्ती घातक असून यामुळे देशाची एकता आणि अखंडता याला धोका निर्माण होत आहे.
यावेळी महात्मा गांधी अमर रहे , महात्मा ज्योतीबा फुलेंचा विजय असो व
गटारातले किडे … मनोहर भिडे
वळवळणारे किडे …. मनोहर भिडे
माथेफिरू भिडे ….. करतोय किडे
अटक करा अटक करा … मनोहर भिडे ला अटक करा या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी शहराघ्यक्ष दिपक मानकर , कार्याघ्यक्ष प्रदीप देशमुख , बाबा पटील , सौ पुनम पाटील , रूपाली ठोंबरे , पुजा झोळे ,बाळासाहेब बोडके , बाबा धुमाळ , प्रिया गदादे , विनोद ओरसे ,संतोष नांगरे , अब्दुल सत्तार , विनोद पवार , शिवाजी पाडाळे , संतोष बेन्द्रे . सोनाली गाढे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
