Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘मोदींच्या होर्डिंग्ज’ची प्रशासनाकडून दबाखाली अतिरेकी जाहीरातबाजी…! काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा आरोप


पुणे  – पंप्र मोदीजींनी उद्घाटन केलेल्या “१०० स्मार्ट सिटी प्रकल्पातील ‘पुणे शहराचा’ व मेट्रोचे ऊदघाटन केलेल्या ‘मेट्रो स्टेशन्स च्या पार्किंग सुविधांचा’ मागोवा व माहीती पंतप्रधान मोदी जींनी घेण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी आज पुणे येथे त्यांचे आगमनाच्या पुर्व संध्येस केली.

मेट्रो स्टेशन्स जवळ “खाजगी वाहनांच्या पार्किंग ची किमान सोय ही नसेल” तर मेट्रोचा वापर पुणेकर नागरीक कसा करणार असा सवाल देखील केला. शहरातील वहातुक कोंडी व प्रदुषण कमी करण्यासाठी दिल्ली प्रमाणे मेट्रो सेवेचा वापर जर लोकांनी जास्तीत जास्त करावा असे वाटत असेल तर त्या प्रमाणात मेट्रोस्टेशन्स जवळ ‘किमान पार्किंगची सुविधा’ मात्र करण्यात आली नाही हे अदुरदर्शीपणा नियोजन शुन्यतेचेच हे लक्षण असल्याची टिका काँग्रेस ने केली. तसेच, भाजपचे सत्ताघारी नेते दबावतंत्राचा वापर करीत, मनपा आयुक्त व प्रशासनावर दबाव आणून, मनपा कडून जाहिरातदार संस्थांच्या फलकांवरील ‘विविध ऊत्पादकांच्या जाहीरातींचे करारनामे चालु असतांना, अरेरावीने, होर्डिंग्ज व्यवसाईकांना नविचारता होर्डिंग्जच्या लॅाक सिस्टीम मधील लोखंडी कापून मोदींच्या स्वागताचे फ्लेक्स लावले गेले. मनपा प्रशासनातील अधिकारी व सेवकांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागताचे अतिरेकी फ्लेक्स लावल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!

होर्डिंग्ज व्यवसाईकांवर अरेरावीने, दडपशाहीने, मनपा – अघिकाऱ्यांच्या दमबाजीने या जाहीराती लावल्याचे समजते आहे. होर्डिंग्ज व्यवसाईक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांमध्ये या नुकसानी विषयी तीव्र चिंता व नाराजी व्यक्त केली गेली. “मोदी स्वागताची अतिरेकी आतषबाजी” करून, करोडोंच्या पैशांची ऊधळपट्टी करण्याचे व पुणे शहर विद्रुप करण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप ही काँग्रेस ने केला. 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading