Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest News

मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये शुभांगी अत्रे दुहेरी भूमिकेत!


दर आठवड्याला एण्‍ड टीव्‍हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाबीजी घर पर है’ प्रेक्षकांना विनोदी व धमाल एपिसोड्सचे मनोरंजन देते. आणखी एका कॉमेडी व मनोरंजनाने भरलेल्‍या एपिसोडसह प्रेक्षकांना आनंदित करत मालिकेच्‍या रोमांचक कथानकामध्‍ये अंगूरी भाबी (शुभांगी अत्रे) दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. निरागस अंगूरी भाभी क्‍लब डान्‍सर ‘चमेली जान’च्‍या भूमिकेत पाहायला मिळणार आहे, जी सर्वांना भुरळ घालते. या नवीन अवताराबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत अंगूरी भाबी (शुभांगी अत्रे) म्‍हणाल्‍या, ”एपिसोडमध्‍ये कमिशनर (किशोर भानुशाली), हप्‍पू (योगेश त्रिपाठी) व मनोहर (नितीन जाधव) आंतरराष्‍ट्रीय गुन्‍हेगाराच्‍या प्रेमिकेला अटक करण्‍यासाठी गुपचूप जातात. पण त्‍यांचा अंगूरी सारखी हुबेहूब दिसणाऱ्या महिलेशी सामना होतो, जिचे नाव ‘चमेली जान’ असते, ज्‍यामुळे ते अचंबित होतात. पण तिच्‍याशी सामना झाल्‍यानंतर अचानक लाइट जाते आणि लाइट आल्‍यानंतर ती दुखापत झालेल्या अवस्‍थेत मदत मागत असते. दरम्‍यान पारंपारिक गृहिणी असण्‍यासाठी तिवारीने (रोहिताश्‍व गौड) अपमान केल्‍यामुळे अंगूरीचे मन दुखावते. यामुळे ती घर सोडून जाते. ही संधी साधत कमिशनर व मनोहर अंगूरीकडे जातात आणि तिच्‍याकडे गुन्‍हेगाराला पकडण्‍यासाठी मदत मागतात, जे अंगूरी मान्‍य करते. कथानक पुढे सरकते तसे तिवारी आणि विभुती (आसिफ शेख) स्‍वत: वेषांतर करून क्‍लबमध्‍ये जातात, पण त्‍यांना पुढे काय घडणार हे माहित नसते. एका घटनेमधून दुसरी घटना घडते आणि यानंतर घडणाऱ्या घटनांमधून प्रेक्षकांना हास्‍य, सरप्राइज व अनपेक्षित ट्विस्‍ट्सचे मनोरंजन मिळेल.”
दुहेरी भूमिका साकारण्‍याबाबत आपला उत्‍साह व्‍यक्‍त करत शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ”मला चमेली जानची भूमिका साकारण्‍याचा आनंद झाला. विविध प्रसंगी नृत्‍य करण्‍यामधून मला खूप आनंद मिळाला (हसते). कलाकाराची नेहमी विविध भूमिका साकारण्‍याची इच्‍छा असते. मालिका ‘भाबीजी घर पर है’चा भाग असल्‍याने मी स्‍वत:ला भाग्‍यवान मानते. ही मालिका दर आठवड्याला नवीन कथानक सादर करते, ज्‍यामधून मला विविध गोष्‍टी करण्‍याची, माझ्या लुकसह प्रयोग करण्‍याची आणि प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन सादर करण्‍याची संधी मिळते. चमेली जान व अंगूरी यांच्‍यामध्‍ये अदलाबदल करण्‍याचा अनुभव अद्भुत होता. दोन्‍ही महिलांचे मूड व पेहरावांमध्‍ये बदल करण्‍याचे आव्‍हान असताना देखील मी त्‍याचा आनंद घेतला. प्रत्‍येक पात्रासाठी पेहराव, मेकअप, कॉस्‍चूम व आभूषणे बदलण्‍यासाठी वेळ लागल्‍यामुळे प्रक्रिया वेळ-खाऊ, पण आनंददायी होती. माझ्या नेहमीच्‍या लुकपेक्षा काहीसा वेगळा लुक प्राप्‍त करण्‍याचा अनुभव रोमांचक व उत्‍साहवर्धक होता. यामधील सर्वात आनंददायी बाब म्‍हणजे माझे डान्‍स सीक्‍वेन्सचे नृत्‍यदिग्‍दर्शन. मोठी होत असताना बॉलिवुड चाहती असल्‍यामुळे मी झीनत अमान, हेलन, माधुरी दिक्षित व रेखाजी यांसारख्‍या स्‍टार अभिनेत्रींच्‍या पडद्यावरील आयटम गाण्‍यांमधील आयकॉनिक परफॉर्मन्‍सचे कौतुक करते. त्‍यांच्‍या पात्रांमधून प्रेरणा घेत मी चमेली जानची भूमिका योग्‍यरित्‍या साकारण्‍यासाठी आणि हावभाव योग्‍य असण्‍यासाठी अनेक गाणी व सीन्‍स पाहिले. आम्‍ही नेहमी प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन, धमाल व रिफ्रेशिंग सादर करण्‍याचा प्रयत्‍न करतो. क्रिएटिव्‍ह प्रक्रियेमध्‍ये सतत संशोधन, विचार आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी अद्भुत व मनोरंजनपूर्ण पात्र तयार करण्‍याचा समावेश असतो. हा एपिसोड प्रेक्षकांना मनोरंजनासोबत हसवून-हसवून लोटपोट करेल. प्रेक्षकांनी आमच्‍यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि प्रेक्षकांकडून प्रत्‍येक पात्राला मिळणारे प्रेम व कौतुकामधून आम्‍हाला प्रत्‍येक वेळी अधिक उत्तम परफॉर्मन्‍स करण्‍यास प्रेरणा मिळते.”
या आठवड्यात तुमच्‍या लाडक्‍या अंगूरी भाबीला दुहेरी भूमिकेत पाहण्‍यासाठी पहात राहा ‘भाबीजी घर पर है’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading