मणिपूर मध्ये झालेली घटनांच्या निषेधार्थ बीएसएनएल ऑफिस मध्ये निदर्शने
पुणे : बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन, बीएसएनएल वर्किंग वुमन को-ऑर्डिनेशन कमिटी आणि ऑल इंडिया बीएसएनएल DOT पेन्शनर असोसिएशन तर्फे आज दिनांक 27/7/2023 संपूर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या सुट्टी मध्ये 1.30 ते 2.00 या दरम्यान मणिपूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने करण्यात आले.
यावेळी मनीपुर येथे महिलांवर होत असलेल्या अन्यायाचा व मनीपुर येथे होत असलेल्या जातीय दंगली विषयी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी महिलांनी सुरक्षे बाबत चिंता व्यक्त केली व यापुढे सरकार वर भरोसा ठेवण्यात काही उपयोग नाही यापुढे महिलांना स्वतः ची सुरक्षा स्वतः करावी लागेल अशा भावना व्यक्त केल्या तसेच सर्व महिला हातात काठी घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या व मनीपुर सरकार तात्काळ बरखास्त करावे व या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.
यावेळी कॉम्रेड एम आय जकाती, कॉ. विकास कदम, कॉ. मंजुषा लचके, कॉ.शामा गांधी कॉ.शैलजा ताकवले , यांनी मार्गदर्शन केले सुत्रसंचलन कॉ.संदीप गुळूंजकर यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.श्रीकांत यादव यांनी केले. यावेळी शेकडो कर्मचारी उपस्थित होते यामधे महिला कर्मचार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
