” हिरा नाही तर बॉटल ओपनर ” तमन्ना भाटिया जगातील पाचव्या-सर्वात मोठ्या हिऱ्याच्या मालकीबद्दल सांगितली खास गोष्ट !
पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटिया चा अलीकडेच सोशल मीडियावर चमकणाऱ्या हिऱ्यासोबत पोझ देणारा एका जुना फोटो व्हायरल झाला. बर्याच मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तिच्याकडे जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा आहे जो तिला राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला यांनी भेट म्हणून दिला होता. आता अभिनेत्रीने शेवटी व्हायरल फोटो मागची खरी गोष्ट सांगितली आहे आणि ती तितकीच गंमतीदार आहे. (“Not a diamond but a bottle opener” Tamannaah Bhatia talks about owning the fifth-largest diamond in the world!)
तमन्ना भाटियाने नुकताच हाच फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरी वर शेअर केला आणि त्या बद्दल स्पष्टीकरण दिलं आहे या हिऱ्याबद्दल सगळ्यांचा गैरसमज झाला होता खरं तर तो हिरा नसून एक बॉटल ओपनर आहे असं तिने सांगितलं. तिच्या इंस्टाग्राम पोस्टला तिने मजेशीर कॅप्शन दिलं ती अस लिहिते ” आम्ही बॉटल ओपनरसह फोटोशूट करत होतो वास्तविक हिरा नाही” #girlsliketoclickpics”
तमन्ना भाटिया सध्या तिच्या आगामी तमिळ चित्रपट जेलरमधील कावला या गाण्यासाठी पुन्हा चर्चेत आली आहे. जेलर व्यतिरिक्त तिच्याकडे तेलुगुमध्ये भोला शंकर, मल्याळममध्ये बांद्रा आणि तमिळमध्ये अरनमनाई 4 ही चित्रपट देखील आहे सोबतीला तमन्ना निखिल अडवाणी दिग्दर्शित जॉन अब्राहमसोबत वेदा मध्ये झळकणार आहे.
