Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

महिला बचत गट स्पर्धेत उडान महिला बचत गट अव्वल

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे आयोजित महिला बचत गट स्पर्धेत काळेपडळ येथील उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकाविला. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक आणि पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांंक पटकाविला.

गणेश कला क्रीडा मंच येथे उत्कृष्ट महिला बचत गट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर यांच्या हस्ते विजेत्या महिला बचत गटांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, माजी नगरसेविका रुपाली धाडवे, पल्लवी जावळे, सुशिला नेटके, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, स्पर्धाप्रमुख सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते.

अन्नपूर्णा महिला व्यवसाय बचत गट, समिता महिला बचत गट, उर्जा महिला बचत गट, सावित्री ज्योती महिला बचत गट, स्वाभिमानी महिला बचत गट, हर्ष श्रावणी महिला बचत गट आणि आधार महिला बचत गट या बचतगटांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. लकी ड्रॉ अंतर्गत टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, कुलर, मिक्सर यांसह १० लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली. पहिला क्रमांक किरण साळुंके, दुसरा क्रमांक स्वाती प्रसादे, तिसरा क्रमांक जयश्री पिराले, चौथा क्रमांक प्रतिमा इंगवले, पाचवा क्रमांक सविता सगस हे यंदाचे विजेते ठरले. सर्व सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

स्पर्धेमध्ये उडान महिला बचत गटाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ५१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बकोरी येथील जय मल्हार महिला बचत गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये ३१ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पानमळा येथील आधार महिला बचत गटाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना रुपये २१ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ ७ संघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading