डीईएसमध्ये भारतीय प्रजातीच्या दोन हजार वृक्षांचे रोपण
पुणे : डीईएस बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) आणि फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या परिसरात भारतीय प्रजातीच्या दोन हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कॉर्पस, नेचर क्लबच्या (निसर्ग सन्मित्र) ८५० विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला.
रघुनाथ ढोले देवराई फाउंडेशन, संदीप काळे मित्र परिवार आणि मिहीर गोडबोले ग्रासलँड ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, सचिव श्री. धनंजय कुलकर्णी, डॉ. प्रसाद खांडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, बोटॅनिकल गार्डन प्रबंधक सी. ए. सुनील भिडे उपस्थित होते.
