Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेतर्फे वृक्षारोपण

पुणे :अखिल भारतीय पूर्व सैन्य सेवा परिषद महाराष्ट्र आणि गोवा सह युनियन बँक ऑफ इंडिया व भारतीय वायुसेनेचे ७,टेट्रा स्कूलच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम सफलतेने संपन्न झाले. तसेच अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषेदेच्या सदस्यांनी लोहगाव येथील ईश्वर-पुरम संस्थेच्या परिसरातही आज वृक्षारोपण केले.

हे कार्यक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक पाऊल घेण्याचे होते, ज्यामुळे विविध प्रकारचं वृक्षांची वायुसेना स्टेशन पुणे आणि ईश्वर पुरम संस्थेच्या परिसरात लागवड़ केली.

या कार्यक्रमात पूर्व सैनिक, वायुसेनेचे कर्मचारी, यूनियन बँक ऑफ इंडिया चे अधिकारी, विद्यार्थी,आणि ईश्वर पुरम संस्थेच्या व्यवस्थापन संघातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदरांतच, वायुसेना स्टेशन पुणे चे एयर कमोडोर शेखर यादव, ग्रुप कॅप्टन पुनीत,विंग कमांडर पूजा ठाकूर, यूनियन बँक ऑफ इंडिया पुणे विभागीय व्यवस्थापक पार्थसारथी दास, विभास पद्मनाभ, शाखा प्रबंधक संजीव कुमार सिंग, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद चे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त), AVM नितिन वैद्य, वीरेंद्र महाजन, अशोक तिवारी, आणि सुभेदार मेजर शेळके हजर होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading