Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

भाषिक कौशल्ये विकासासाठी ध्वनी आधारित अध्ययन प्रयोगशाळा (ऑडिओ लर्निग लॅब) राज्यातील पहिलाच उपक्रम

पुणे : भाषिक कौशल्ये विकासासाठी अरण्येश्‍वर परिसरातील ‘विद्या विकास शाळे’त माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून ध्वनी आधारित अध्ययन प्रयोगशाळा (ऑडिओ लर्निग लॅब) विकसित करण्यात आली आहे.

विज्ञान आणि गणित या विषयांच्या प्रात्यक्षिकांसाठी शाळा-शाळांमध्ये प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. परंतु, भाषा विषयाच्या ध्वनी आधारित अध्ययनासाठी राज्यातील ही पहिलीच प्रयोगशाळा ठरली आहे.

पुस्तकातील धडे अपलोड करून वाचन आणि श्रवण या दोन्ही क्रिया प्रयोगशाळेत एकाच वेळी करता येत असल्याने गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. त्यासाठी टॅब, हेडफोन आणि ‘ऐकाकी’ ऍपचा वापर करण्यात आला आहे.

इयत्ता पाचवी ते दहावीचा भाषा अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करण्यात आला आहे. सुपरमाईंड आणि लर्नकीज एज्युटेन्मेंट या संस्थांचे तांत्रिक सहाय्य लाभले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार मिसाळ यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

मिसाळ म्हणाल्या, ‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आनंददायी आणि कृतियुक्त शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पारंपरिक शिक्षणाला माहिती-तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शिक्षणाची प्रक्रिया सोपी होणार आहे. या उद्देशाने ही अभिनव प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.’’

संस्कृत विद्या मंदीर संस्थेचे अशोक जांभोरकर, विनायक जांभोरकर, मुख्याध्यापिका उर्मिला बामणे, लर्नकीजचे सचिन पंडित, सुपरमाईंडच्या मंजुषा वैद्य, महेश वाबळे, जितेंद्र पोळेकर, प्रशांत दिवेकर, प्रशांत थोपटे, कैलास मोरे, राजू कदम, अर्चिता मडके, दया कुलकर्णी, समीर साळुंके, सारीका ठकार, सुनीता जक्का, वंदना आपटे, सुनीता शिंगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading