प्रमृता अडकणार लग्नबंधनात; गुपचुप उरकला साखरपुडा
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली जोडी म्हणजे पुण्याची टॉकरवाडी अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. अमृताने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

अमृताने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला असून; पुढील काळात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ” या पोस्टमध्ये अमृताने त्यांच्या लग्नाची तारीख देखील जाहीर केली आहे. येत्या 18 नोव्हेंबर 2023 ला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.

खर तर’बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात या दोघांची एकमेकांसोबत मैत्री झाली. नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. अन् आता हे दोघेही लग्न करणार आहेत. अमृताने काही काळ आर जे म्हणून काम केल्यानंतर अभिनयाला सुरूवात केली. सध्या ती संकर्षण कऱ्हाडे सोबत ‘नियम व अटी लागू’ हे नाटक करत आहे. तर अभिनेता प्रसाद जवादे कलर्स मराठी वरील ‘काव्यांजली’ या मालिकेत आर जे ची भूमिका साकारत आहे.

