कोविड काळात भाजप चा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरून रुग्णाची सेवा करत होते-डॉ भारती पवार
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा समर्पणदिनाचे आयोजन करण्यात आले होते पुणे शहर भा ज प च्या वतीने पूर्ण पुणे शहरात ५३००० हजार शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम झाले या वेळी रक्तदान शिबिरे,अपंगांना उपयुक्त साहित्य वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभाग क्रमांक १८ मधील कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री श्रीमती भारती पवार या उपस्थित होत्या या कार्यक्रमात बोलताना श्रीमती पवार म्हणाल्या की कोविड काळात भारतीय जनता पार्टी च्या प्रत्येक कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून नागरिकांना अनेक प्रकारे मदत केली त्या मध्ये अगदी बेड मिळवून देण्यापासून ते रुग्ण सेवेपर्यंत सर्वच सेवा भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्ता ते देश नेतृत्वाने केले सेवा समर्पण हे भारतीय जनता पार्टी चे बीज असून ते प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात रुजले आहे
या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की आज शहरात सुमारे 100 च्या वर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वच प्रभागात सेवा समर्पणाचे कार्यक्रम बूथ स्तरापर्यंत आयोजित केले आहेत या माध्यमातून जास्तीतजास्त नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे
केंद्रीय मंत्री भारती पवार, शहराध्यक्ष धीरज घाटे सरचिटणीस राजेश येनपुरे दीपक पोटे,युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर , माजी नगरसेवक अजय खेडेकर,उपाध्यक्ष नामदेव माळवदे ,चंद्रभूषण जोशी माजी नगरसेविका आरती कोंढरे पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
