Friday, May 1, 2026
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्याचे नियोजन

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  सचिन्द्र प्रताप सिंह व पीएमपीएमएलचे अधिकारी यांनी महामेट्रोचे ऑपरेशन मॅनेजर  मनोज कुमार डॅनियल यांच्या समवेत आज  शिवाजीनगर सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली व पीएमपीएमएल कडून सुरू करण्या येणाऱ्या मेट्रो फिडर बससेवेबाबत चर्चा केली.
त्यानुसार वनाज ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट व पिंपरी-चिंचवड म.न.पा. ते शिवाजीनगर सिव्हील कोर्ट या मार्गावरील मेट्रो स्टेशन वरून मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशन येथून बस मार्ग क्र. ३६ – शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशन ते चिंचवडगांव व बस मार्ग क्र. २०४ – हडपसर (भेकराईनगर) ते चिंचवडगांव (हडपसरकडे जातांना शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशन मार्गे) सुरू करण्याचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading