Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला -युवक क्रांती दल

पुणे:जात,धर्म,भाषा,प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणाने माणसातल माणूसपण हरवलं आहे. त्यामुळेच या माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडत आहे. ज्या समाजात महिलांना देवी समान वागणूक देऊन तिची पूजा केली जाते त्या समाजाचा विद्रुप चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. तुम्ही जिथे कुठेही असाल, तिथे बोला. पुरुषांच्या जमावाने वेढलेल्या त्या मणिपूरच्या निर्वस्त्र महिलांसाठी असं मत लोकायतच्या समन्वयिका अलका जोशी यांनी मांडले. निमित्त होते मणिपूर येथे महिलांवर झालेल्या क्रूर आणि अमानवी अत्याचाराच्या विरोधातील आयोजित जाहीर निषेध आंदोलनात. हे आंदोलन कलाकार कट्टा, गुडलक चौकात युवक क्रांती दल व लोकायतने आयोजित केलं होत. भर पावसातही हे आंदोलन चालू होत.

युवक क्रांती दलाचे प्रतिनिधी सचिन बर्वे म्हणाले कि एखाद्या समुदायाकडून दुसऱ्या समुदायाचा बदला घेण्यासाठी म्हणून त्या समुदायातील ‘महिलांचा विनयभंग करणे’ ही अभिमानाची बाब समजली जाते. काही दिवसांनी दंगली थांबतील, मात्र, या महिलांना आपल्यावरील हा आघात आयुष्यभर मनात ठेऊन जगावं लागणार आहे. मणिपुरमध्ये निर्लज्जतेचे सर्व स्तर ओलांडून असे कृत्य सोशल मीडियावर अपलोड करण्याचेही धाडस गुन्हेगारांमध्ये आहे, यावरून केंद्र-राज्य सरकारचे घोर अपयश दिसून येते!या जमावाच्या/झुंडशाहीच्या विरोधात जे बोलणार नाहीत ते त्या गर्दीत सामील आहेत त्यामुळे तुम्ही जिथेही असाल तिथे या झुंडशाही विरोधात बोला असं शेवटी सर्व उपस्थितांना आव्हाहन करण्यात आले.
याद करो संविधान का नारा, अमन शांती और भाईचारा व शरम करो शरम करो क्रेंद्र सरकार शरम करो अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनात लोकायतचे ऋषिकेश येवलेकर, श्रद्धा रेखा राजेंद्र, युवक क्रांती दलाचे जांबुवंत मनोहर, सचिन पांडुळे, नव समाजवादी पर्याय या संघटनेचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading