Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

इर्शाळवाडी : दुसऱ्या दिवशी बचाव कार्यालय सुरुवात; 153 नागरिकांचा शोध सुरू

रायगड : खालापूर जवळच्या  इर्शाळवाडीत आज पुन्हा एकदा बचाव आणि शोधकार्य सुरू करण्यात आलंय. बुधवारी रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर 153  हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. दुर्गम डोंगराळ भाग असल्यानं कुठलीही मशिनरी पोहोचू शकत नाही. त्यामुळे सगळा भार मनुष्यबळावरच आहे. इरसालवाडीत काल दिवसभर बचावकार्य सुरू होतं मात्र संध्याकाळी पडणा-या मुसळधार पावसामुळे त्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी पुन्हा एनडीआरएफ, टीडीआरएफ यांच्यासह अनेक संस्थांच्या कर्मचा-यांनी शोधकार्य सुरू करण्यात आले आहे अशी माहिती मदत आणि पूर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

दुसऱ्या दिवशी मदत कार्याला सुरुवात झाली असली तरी पावसाचा जोर आणि धुके यामुळे बाचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच आहावामान विभागाने रायगड जिल्ह्याला आजही रेड अलर्ट दिला आहे, यामुळे बाचावकार्याचा वेग मंदावण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading