Saturday, October 17, 2026
Latest NewsPUNE

नारदीय कीर्तनातून समरसतेचा जागर 

 पुणे: सामाजीक समरसता मंच व हरी कीर्तन उत्तेजक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोळवळकर विद्यालयात अधिक मास निमित्ताने  नारदीय कीर्तनाचे आयोजित केले होते. मुलांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार तसेच सामाजीक समतेतून समरसता रुजवण्यासाठी अशी 100 कीर्तने होणार आहेत.  याचे उद्घाटन दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ विश्वस्त अक्षय गोडसे,  समरसता गती विधी पाश्चिम महाराष्ट्र संयोजक अभय ठकार यांच्या हस्ते झाले.
या वेळी प्रांत मंडळ सदस्य डॉ प्रसाद खंडागळे यांनी  प्रास्ताविक केले. ह भ प कुमारी अग्रणी अमित साठे हिने दोन सत्रात कीर्तन केले. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर विश्वस्त राजेंद्र बलकवडे, दुर्गम प्रतिष्ठानचे नंदू जाधव,  मातंग समाजाचे नंदु शेंडगे,  वाल्मिकी समाजाचे नंदू जाधव, रवी ननावरे, अविनाश देशपांडे, नारद मंदिराच्या जयश्री देशपांडे, प्रेमा कुलकर्णी,   रवी पाठारे, मुख्याध्यापक वासंती बनकर,  मनीषा खेडकर, विलास लोंढे, संस्थेचे  मिलिंद कांबळे उपस्थित होते. समाजातील अश्या उपक्रमात आम्ही सदैव  मदत करू अशी भावना  गोडसे यांनी व्यक्त केली . विकास डिग्रजकार यांनी आभार मानले. यावेळी एक हजार पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading