अंबादास दानवेंनी सभागृहात सादर केला किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओचा ‘पेनड्राईव्ह’
मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाला आहे. किरीट सोमय्या आणि भाजप नेते या व्हीडीओमुळे अडचणीत आले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या कथित व्हीडीओवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान परिषदेत बोलताना आक्रमक झाले आहेत.
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, काही भाजप नेत्यांनी ईडी, सीबीआयची भीती दाखवून अनेक महिलांना ब्लॅकमेल केले आहे. या नेत्याला सीआयएसएफची सुरक्षा आहे. या सुरक्षेचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो. काही महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातो.
‘माझ्याकडे सोमय्यांचे ८ तासांचे व्हीडीओ आहेत ते मी सभापतींकडे देणार आहे. असा हा भाजपचा नेता म्हणजे किरीट सोमय्या. माझ्याकडे या देशद्रोही नेत्याच्या व्हीडीओचा पेनड्राईव्ह आहे. या नेत्याला सत्ताधारी संरक्षण देणार का? की त्यांच्यावर कारवाई करणार’ असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
