Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

घरी बसा म्हणणारे येवून भेटतात, यातच सगळं आलं – जयंत पाटील

मुंबई : जे येतात त्यांना शरद पवार भेटता. मात्र, शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर शंका घेण्याची गरज नाही. कारण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, जे पवारांना घरी बसा म्हणतात, तेच आता त्यांना येवून भेटतात, या पेचातून मार्ग काढा असे सांगतात, यातच सगळं आलं, अशी खोचक टीका देखील जयंत पाटील यांनी यावेळी केली.

पाटील म्हणाले, आज पुन्हा एकदा अजित पवार व त्यांच्या सोबतचे आमदार शरद पवार यांना भेटायला आले होते. साहेबांसोबत त्यांनी काम केले आहे त्यामुळे त्यामुळे भेट घेण्यात काहीच गैर नाही. त्यांनी पुन्हा एकदा भेट घेवून साहेबांना मार्ग काढण्याची विनंती केली आहे. मात्र, पवार साहेब हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, असे पुन्हा एकदा पाटील यांनी सांगितले.

शरद पवार उद्या बेंगलोरमध्ये 

शरद पवार युपीए चा महत्वाचा भाग आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार हजार राहणार आहेत. त्यासाठी शरद पवार उद्या बेंगलोरला जाणार आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading