Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवारांच्या गटाने घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : आज अजित पवार गटानं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत  सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित होते. अजित पवार गटाच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो. सर्वांनी नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतला. शरद पवार यांना विनंती केली, की एनसीपी एकसंघ कसा राहू शकतो असा प्रयत्न करावा. मात्र शरद पवार यांनी यावर कोणितीही प्रतिक्रिया दिली नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान या भेटीवर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी अंबादास दानवे यांच्या बैठकीमध्ये होतो. अचानक मला फोन आला. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. भेट घेऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी जे काही केलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. जे घडलं त्यातून मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र यावर शरद पवार काहीच बोलले नाहीत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की आमचा सरकारला पाठिंबा नाही, त्यामुळे आमच्या बैठकीची व्यवस्था विधानसभाध्यक्षांनी करावी. ही भेट अचानकपणे झाली, भेटीचा नेमका काय उद्देश होता हे मला माहिती नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading