Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

अतिरुद्र महायज्ञाची ३३ कोटी देवता यागासह पूर्णाहुती 

पुणे : जगाच्या कल्याणाकरिता, आरोग्यसंपन्न समाजाकरिता सुरु असलेल्या अकरा दिवसीय अतिरुद्र महायज्ञाची सांगता ३३ कोटी देवता याग व पूर्णाहुतीने झाली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात महा सुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, रुद्र होम आणि गणेश याग यांसह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी यज्ञाला प्रारंभ झाला होता. वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह एकाच वेळी तब्बल १२५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला. त्याच्या सांगता प्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू शेठ सांकला, रंजना सांकला आदी उपस्थित होते. सलग अकरा दिवस रुद्र होम, गणेश याग यांसह विविध अभिषेक देखील करण्यात आले. गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आले होते.

गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योर्तिलिंग नद्या, रामेश्वरम २१ कुंडांचे जल याकाळात वापरले गेले. तसेच, २१ आयुर्वेदिक औषधी  वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात आले. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला. अतिरुद्र होम हा या धार्मिक विधींतील सर्वोच्च बिंदू होता. याशिवाय मेधा दक्षिणा मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होम, महालक्ष्मी होम श्री सुक्त, नवग्रह होम, अरुणाप्रश्न याग, महालक्ष्मी होम श्री सुक्तदेखील झाले. अतिरुद्र याग व इतर धार्मिक कार्यक्रमांत भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading