Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुबईत २० जुलै ला होणाऱ्या मोर्चीच्या तयारीसाठी कोल्हापुरात जोरदार बैठका चालू


कोल्हापूर  : गायरान जमिन अतिक्रमण धारक यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या अन्न्यायाच्या निषेधार्ह न्२० जुलै २०२३ रोजी मुंबई विधान भवनावर पक्षाच्या वतीने महामोर्चाचे आयेजन करण्यात आले आहे . त्यास अनुसरुन कोल्हापूर वंचित बहुजन आआघडीची बैठक नुकतीच कोल्हापूर सर्कीट हाऊस या ठिकाणी पार पडली . आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलींद सनदी , जिल्हा महासचिव उत्तर सिद्धार्थ कांबळे, शहराध्यक्ष मिलिंद पोवार, यांनी नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले व आतर ही बाबींवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीमध्ये मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होणार असून तसेच पाऊस पाण्याचे दिवस असून कार्यक्र्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी महिला आघाडी अध्यक्षा वासंतीताई म्हेतर, महिला आघाडी महासचिव भाग्यश्रीताई ज्ञानवंशी, पन्हाळा तालुका अध्यक्ष दामाजी जाधव, शिरोळ तालुका अध्यक्ष संदिप कांबळे, हातकनंगले तालुका अध्यक्ष अश्पाक देसाई, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे के एल भारती सह जिल्ह्यातील विविध विंग्सचे पदाधिकारी उपस्थित होते .
सदर बैठक अतुल बहुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
तसेच या बैठकीस जिल्ह्यातील अनेक भागातून पदाधिकार्यांसह अन्य कार्यकर्ते ही उपस्थितीत होते.
यामध्ये युवक आघाडीचे नितीन कांबळे, दशरथ कांबळे, जिल्हा कमेटीचे प्रकाशकांबळे कोषाध्यक्ष, शिरोळ तालुका कमेटीचे विश्वास शिंगे ,उदय कांबळे, अमित नागटिळे, विद्याधर कांबळे हे ही उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading