सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विक्रमादित्य कुलकर्णी, विश्वजीत जाधव यांना विजेतेपद
पुणे : बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित सहाव्या स्वर्गीय श्री अरविंद दत्तात्रय लेले मेमोरियल रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत अ गटात विक्रमादित्य कुलकर्णी याने, तर ब गटात विश्वजीत जाधव या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत अ(1201वरील रेटेड मधील)गटात विक्रमादित्य कुलकर्णीने बुमीनाथन ललितादित्यआयेनारला बरोबरीत रोखले व 6 गुणांची कमाई केली. ब (1000 व 1200रेटिंग मधील)गटात विश्वजीत जाधवने सुधान देवचा पराभव करून 6.5 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, याच गटात शंतनु हाडे याने सुयश मंचेकरला पराभुत करून 6 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. सुधान देवने 5.5गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या विक्रमादित्य कुलकर्णीला करंडक व 5000रूपये, तर ब गटातील विजेत्या विश्वजीत जाधव याला करंडक व 2000रूपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एमआयटी स्कूलचे माजी प्राचार्य अनिल दांडेकर, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट ट्रस्टी प्रकाश कुंटे आणि हर्षल लेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सातवी फेरी:
गट अ: 1201वरील रेटेड मधील गट
विक्रमादित्य कुलकर्णी (6गुण) बरोबरी वि. बुमीनाथन ललितादित्यआयेनार (5.5गुण);
सिद्धांत ताम्हणकर (5.5गुण) वि.वि.वरद वालदे (4.5गुण);
आदित्य गद्रे(4.5गुण) पराभुत वि. यश कापडी(5.5गुण);
सौरभ म्हामने(5गुण) वि.वि.कुशाग्र जैन(4गुण);
मिहिर सरवदे(5गुण) वि.वि.विरेश शरणार्थी(4गुण);
अक्षज पाटील(5गुण) वि.वि.सुभाष केव्ही(4गुण);
आर्यन कर्माळकर(4गुण) पराभुत वि. केवल निर्गुण(5गुण);
ओम लामकाने(4.5गुण) बरोबरी वि. प्रथमेश शेरला(4.5गुण);
आर्यन सिंगला(4.5गुण) बरोबरी वि. धनश्री खैरमोडे (4.5गुण);
गट ब:(1000 व 1200रेटिंग मधील गट):
सुधान देव(5.5गुण) पराभुत वि. विश्वजीत जाधव (6.5गुण);
सुयश मंचेकर (5गुण) पराभुत वि.शंतनु हाडे (6गुण);
मानसी टिळेकर(4.5गुण) पराभुत वि. पार्थ दुरगुडे(5.5गुण);
साई पाटील (5.5गुण) वि.वि.सम्यक कुलकर्णी (4.5गुण);
अथर्व रांजणे(5गुण) वि.वि.अथर्व बाकरे (4गुण);
अविनाश देवशतवर(5गुण) वि.वि.युग बराडिया (4गुण);
मनवेल दास(5गुण) वि.वि.वेदांत काळे (4गुण) ;
आशिष लोंढे (4.5गुण) बरोबरी वि. क्रिशिल शहा(4.5गुण);
प्रदीप कुलकर्णी (4.5गुण) वि.वि.हर्षित पाटील(3.5गुण).
