Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

‘ती’ ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनी ‘पॉवरग्रीड’ची नव्हे तर अदानी कंपनीची

पुणे : पुणे जिल्हयातील तळेगाव ते शिक्रापूर ४०० केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शनिवारी (दि. ८) सकाळी ७.०७ तांत्रिक बिघाड झाला. मात्र, या अतिउच्चदाब वीजवाहिनीची मालकी तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अदानी कंपनीकडे असल्याचा खुलासा पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून सोमवारी (दि. १०) करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या व शिक्रापूर येथील अतिउच्च्दाब उपकेंद्राला जोडणाऱ्या ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वाहिनीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने भारव्यवस्थापनाद्वारे सकाळी १० ते १२.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

मात्र तांत्रिक बिघाड झालेली तळेगाव-शिक्रापूर ४०० केव्ही ही वीजवाहिनी पीजीसीआयएलची नाही, तर या वाहिनीची मालकी तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी अदानी कंपनीकडे असल्याचा खुलासा पीजीसीआयएलकडून करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading