Tuesday, September 1, 2026
Latest NewsSports

दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत शिल्ड, गार्डीयन संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे : पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात शिल्ड, गार्डीयन या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
बाऊन्स फिटनेस अँड स्पोर्टस क्लब येथील मैदानावर  सुरू असलेल्या या स्पर्धेत पाचव्या दिवशी 14वर्षाखालील गटात अगस्त्य कुंटे(2,4,10मि.) याने केलेल्या हॅट्रिक खेळीच्या जोरावर शिल्ड संघाने गार्डीयन संघाचा 4-1असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अखेरच्या साखळी सामन्यात संवेद कासट(2,12मि.) याने केलेल्या दोन गोलाच्या जोरावर गार्डीयन संघाने एव्हेंजर्स संघाचा 3-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना आज(8 जुलै रोजी) शिल्ड व गार्डीयन यांच्यात सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.
खुल्या गटात काल रात्री उशिरा झालेल्या लढतीत  अ गटात निशित हेगडे(3,12, 28मि.) याने केलेल्या हॅट्रिक कामगिरीच्या जोरावर बीकेबी युनायटेड संघाने ओव्हनफ्रेश टस्कर्स संघाचा 3-0 असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात यश शहा 5मि., कुणाल शहा 22मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर वॉरियर्स संघाने समोसा स्ट्रायकर्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
14 वर्षाखालील गट:
शिल्ड: 4(अगस्त्य कुंटे 2,4,10मि .,ओजस नाईक 15मि.) वि.वि.गार्डीयन: 1(संवेद कासट 22मि.)
गार्डीयन: 3(संवेद कासट 2, 12मि., अथर्व इंगळहळीकर 23मि.)वि.वि.एव्हेंजर्स:1(आरूष देवधर 14मि.);
खुला गट:
गट ब: वॉरियर्स: 2(यश शहा 5मि., कुणाल शहा 22मि.) वि.वि.समोसा स्ट्रायकर्स: 0;
गट अ: बीकेबी युनायटेड: 3(निशित हेगडे 3,12, 28मि.) वि.वि.ओव्हनफ्रेश टस्कर्स:0.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading