अश्विनी व मयुरी परत एकत्र येणार?
‘तू चाल पुढं’ ही मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं असून हि मालिका आता एका रोमांचक वळणावर आली आहे. नुकतंच आपण पाहिलं की शिल्पी ने श्रेयसला धक्का मारल्यामुळे तो हॉस्पिटल मध्ये असतो. इथे कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मयुरी तिचे पार्लर चालू ठेवते. तर दुसरीकडे अश्विनीला पोलीस पकडुन नेतात कारण मयुरीच्या पार्लर मध्ये रेखाला झालेला अपघात, आता रेखा तिची तक्रार मागे घेणार का? या सगळ्या प्रकरणा नंतर मयुरी आणि अश्विनी मधील वाद मिटतील का? हे पाहणे मनोरंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका ‘तू चाल पुढं’ सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.


