Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

रंगावलीतून साकारली चापेकर पर्वाची रोमहर्षक कहाणी

पुणे : चापेकर बंधूंनी ब्रिटीश अधिकारी रॅंड याचा खून करुन स्वातंत्र्यसंग्रामात नवे चैतन्य निर्माण केले. अवघ्या विशी-पंचवीशीतील चापेकर बंधूंचा त्याग व शौर्य पाहून असे क्रांतिकारक पुण्यात झाले याचा अभिमान वाटतो. त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक ठरले.  देशासाठी तीन भावांनी दिलेले हे बलिदान एकमेवद्वितीय आहे, त्यांच्या या शौर्याला वंदन करीत चापेकर पर्वाची रोमहर्षक कहाणी रंगावलीतून साकारण्यात आली.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणे व इतिहास प्रेमी मंडळ यांच्या विद्यमाने चापेकर बंधूंनी केलेला रॅंडचा खून या प्रसंगाला १२६ वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने टिळक चौकातील लकडी पूल विठ्ठल मंदिर येथे भव्य रांगोळी काढण्यात आली. यावेळी  श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे  कोषाध्यक्ष दिपक थोरात, बाळासाहेब ताटे  लेखक प्र.के. घाणेकर, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, शिरीष मोहिते, विश्वास भोर,रविद्र फटाळे, राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे, रोमा लांडे उपस्थित होते.
दीपक थोरात म्हणाले,  ब्रिटीश अधिकारी रॅंड याला मारण्याचे आदेश लोकमान्य टिळकांनी   १२६ वर्षापूर्वी चापेकर बंधू यांना दिले होते. लकडी पूल विठ्ठल मंदिर आज ज्या ठिकाणी आहे तिथेच लोकमान्य टिळकांनी हा आदेश दिला. यानिमित्त याच ठिकाणी त्या स्मृती पुन्हा जागविण्यात आल्या

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading