सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅक खुला
पुणे : महापालिकेच्या बाबुराव सणस स्पोर्टस ग्राउंड येथील ॲथलेटिक्ससाठी असणारा सिंथेटिक ट्रॅक स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकारातून खुला करण्यात आला.
सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने ट्रॅक बंद ठेवला होता. तो बंद असल्याने खेळाडूंची अडचण होत होती.
प्रशासनाच्या विरोधात संतप्त पालकांनी आज दुपारी तीन वाजता मोर्चा काढण्याचे ठरविले होते. रासने यांनी पालकांची भेट घेतली.
त्यानंतर रासने यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून प्रशासनाशी चर्चा केली. पालक, खेळाडू आणि प्रशासन यांच्यामध्ये रासने यांनी समन्वय घडवून सिंथेटिक ट्रॅक खुला केला.
ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धा अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी हा ट्रॅक उपयुक्त आहे, आजच्या निर्णयामुळे या खेळाडूंची गैरसोय दूर होणार आहे.
माजी नगरसेवक अजय खेडेकर, अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकडे, संजयमामा देशमुख, धनंजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
