Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘लस्ट स्टोरीज २’ ट्विटरवर होतिये ट्रेंड

अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या एका पाठोपाठ एक प्रोजेक्ट करताना बघायला मिळतेय. नुकत्याच रिलीज झालेल्या, जी करदा ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि पुन्हा ती “लस्ट स्टोरीज 2 ” मधून चर्चेत आली आहे. तमन्नाने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि सोशल मीडिया वर याचा चर्चा देखील होत आहेत. नेटिझन्सने नेटफ्लिक्स आलेल्या या सीरिज मध्ये विजय वर्मासोबतच तिची तिच्या केमिस्ट्री अनुभवली आणि त्याच कौतुक केलं. नेटफ्लिक्सवर लस्ट स्टोरीज 2 आल्या नंतर तमन्ना भाटिया ट्विटरवर ट्रेंड करू लागली कारण चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अभिनेत्रीचे कौतुक होत असल्याने, तिच्या चाहत्यांच्या काय म्हटलं आहे बघू या !
एका चाहत्याने लिहिले, “#LustStories2OnNetflix @MrVijayVarma @NetflixIndia मध्ये तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची अविश्वसनीय केमिस्ट्री पाहून खूप आनंद झाला”
दुसर्‍या ट्विट मध्ये एक चाहता म्हणतो ” खूप चांगली कामगिरी केली असून लोकांना तिचं काम खूप आवडतंय. #LustStories2OnNetflix”
तमन्ना आणि विजयच्या ऑन-स्क्रीन जोडीचे कौतुक करताना एका फॅन ने म्हंटल आहे  “तमन्ना आणि विजय यांनी एकमेकांचे खूप चांगले कौतुक केले आहे. एक जोडी म्हणून त्यांनी खूप चांगले काम  केले #LustStories2OnNetflix @tamannaahspeaks”
तमन्ना भाटिया नक्कीच तिच्या आयुष्यातील वेळ हा वेळ सोशल मीडियावर घालवत असेल. ही अभिनेत्री निःसंशयपणे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात आहे. लस्ट स्टोरीज 2 नंतर तमन्ना मल्याळममध्ये बांद्रा, तेलुगुमध्ये भोला शंकर आणि तमिळमध्ये जेलरच्या रिलीजसाठी सज्ज आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading