समृद्धी महामार्ग : खासगी ट्रॅव्हलच्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू
बुलडाणा : बुलडाण्यातून अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात बसमध्ये आग लागल्याने 25 प्रवासी जिवंत जळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस एका लग्नासाठी जात होती. तेव्हाच पावसामुळे बस रस्त्यावरुन घसरली. या घटनेत बसचा डिझेल टँक फुटला आणि बसला आग लागली. घटनेच बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते. या बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 1 वाजून 35 मिनिटांनी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही बस नागपूरहून पुण्याला जात असताना हा अपघात झाला. बस एका पोलला धडकली.
जखमींना उपचारासाठी बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बसमधून आठ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभागाने मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबरवर संपर्क साधू शकता अशी माहिती देण्यात आली आहे.
या घटनेनंतर दानिश शेख ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दुसरा ड्रायव्हर अरविंद जाधव जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
