संपर्क फाउंडेशनचा पुण्यातील जी२० च्या बैठकीत साक्षरता आणि संख्याशास्त्र या विषयावरील सहभाग
पुणे : प्राथमिक शिक्षणातील ज्ञानाचा परिणाम सुधारण्यासाठी कार्य करणारी अग्रगण्य एनजीओ असलेली संपर्क फाऊंडेशन ही संस्था फाऊंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी या विषयावरील ‘आयुष्यभराच्या शिक्षणासाठी पाया तयार करणे : नॅशनल कॉन्फरंस ऑन फाऊंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी (एफएलएन)‘ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १७ ते २० जून २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आलेल्या चौथ्या जी-२० शिक्षण कार्यकारी समूहाच्या बैठकीचा भाग म्हणून ही परिषद होत आहे. शिक्षण मंत्रालयाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातील संपर्क फाऊंडेशनच्या सहभागातून आयुष्यभराच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साक्षरता आणि अंकओळख यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी संस्थेची कटिबद्धता अधोरेखित होत आहे.
भारतात मूलभूत साक्षरता आणि अंकओळख (एफएलएन) यांचा प्रचार करण्यावर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमाने तज्ज्ञ आणि भागधारकांना शिक्षण विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करून एकमेकांशी सहकार्य करण्याची संधी मिळवून दिली आहे. संपर्क फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर यांना शिक्षण क्षेत्रातील, विशेषतः मूलभूत साक्षरता आणि अंकओळख क्षेत्रातील तज्ञ म्हणून, सहभागी होण्याचे आमंत्रण शिक्षण मंत्रालयाकडून मिळाले आहे.
या राष्ट्रीय परिषदेत बोलताना संपर्क फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत नायर म्हणाले, आयुष्यभराचे शिक्षण आणि पायाभूत शिक्षणापर्यंत सर्वसमावेशी सुलभता सुनिश्चित करण्यासाठी काटकसरीच्या नवीन प्रयोगांवर चर्चा करून त्यांच्यावर अमल करणे हे महत्त्वाचे आहे. आपल्या सरकारी शाळांमधील शैक्षणिक परिणामांमध्ये लक्षणीय परिणाम घडवून आणायचा असेल तर शिक्षकांच्या सक्षमीकरणासोबतच किफायती नवीन प्रयोग आवश्यक आहेत, असा आमचा संपर्कमधील अनुभव आहे. आपल्या सरकारी शाळांमधील एक कोटी शिक्षकांना आपल्याला तातडीने पुन्हा कौशल्य देण्याची गरज आहे कारण त्यांचा थेट वर्गातील शिक्षणावर परिणाम होतो. योग्य अध्यापन प्रक्रिया, सुरचित संसाधनांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देऊन आणि शिक्षणाचे मोजमाप आणि वर्गातील संसाधनांचा वापर यांनुसार हे रीस्किलिंग असावे.
आयुष्यभराच्या शिक्षणाला सहाय्यभूत ठरणाऱ्या धोरण चौकट, नियम आणि तांत्रिक प्रगती यांसारख्या प्रमुख घटकांची निश्चिती करून अंमलबजावणी यांवर परिषदेत चर्चा झालेल्या प्रमुख संकल्पना केंद्रित होत्या. मूलभूत शिक्षणाची सर्वांसाठी सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर सहभागींनी भर दिला.
देशातील सर्व मुलांना इयत्ता ३ पर्यंत आकलनासह वाचन करता येणे आणि गणिताच्या मूलभूत कौशल्यांवर प्रभुत्व मिळविता येईल, याची सुनिश्चिती करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० मध्ये मूलभूत साक्षरता आणि अंकओळख यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या प्राधान्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ व्हिजनचा एक भाग म्हणून डिसेंबर २०२० मध्ये राष्ट्रीय एफएलएन मिशन आरंभ करण्याची घोषणा करण्यात आली.
