अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन
पुणे: संघटनेची सदस्यसंख्या ही त्या संघटनेची आत्मिक शक्ती असते. संघटनेच्या कार्यवाढीसाठी व विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी साधनांची गरज असतेच.पुण्यात कार्यालय उपलब्ध झाल्याने वैचारिक साधनांची शिदोरी मिळेल.. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक मा.रवींद्र वंजारवाडकर यांनी केले.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या महाराष्ट्र व गोवा प्रांताच्या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ३६, प्रार्थना,ईशदान सोसायटी,आनंदनगर मेट्रो स्टेशन जवळ, पौड रोड, पुणे येथे हे कार्यलय असणार आहे.
अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद ही राष्ट्रीय पातळीवर पूर्व सैनिकांसाठी कार्य करणारी नोंदणीकृत व केंद्र सरकारची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असून पूर्व सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदिप बापट (निवृत्त),सचिव वीरेंद्र महाजनी ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
आपले सैनिक सीमेवर आपले रक्षण करतांना आपण बघतोच पण अंतर्गत सुरक्षतेसाठी ह्या अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजाचे नेतृत्व करावे. राष्ट्रीय आपत्तीमध्ये माजी सैनिकांचे योगदान खूप मोठे आहे. महाराष्ट्र व गोवा राज्याची ही संघटना राज्याचे व राष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.अशी अपेक्षा मा.रवींद्र वंजारवाडकर यांनी या वेळी व्यक्त केली.
कार्यालय उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र व गोवा प्रांताचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),एअर व्हॉईस मार्शल जयंत इनामदार ( निवृत्त ),संस्थापक सदस्य एअर कमोडर अरुण इनामदार(निवृत्त),पश्चिम महाराष्ट्र सचिव निवृत्त कर्नल नरेश गोयल,सचिव वीरेंद्र महाजनी,एअर फोर्स असोसिएशनचे पदाधिकारी व निवृत्त विंग कमांडर सुहास फाटक,निवृत्त ब्रिगेडियर धनंजय विध्वांस,योगेश गोगावले,एअर व्हॉईस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त),माजी सैनिक कल्याण संघटक दीपक शेळके,संजय गायकवाड,संघटन मंत्री अशोक बोराटे,डॉ मोरेश्वर गद्रे,माधव देशपांडे यांची मुख्य उपस्थित होती.
