Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

‘पीएनबी हाउसिंग फायनान्स’ने ‘रोशनी’ या आपल्या परवडणाऱ्या गृहकर्ज योजनेचा केला विस्तार

पुणे  : ‘पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने परवडणाऱ्या घरांसाठीची रोशनी ही वित्त योजना प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यासाठी १२ नवीन शाखा उघडल्या आहेत. सामान्य जनांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टाच्या अनुषंगाने घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात ही योजना मदत करते. या योजनेच्या कार्यान्वयासाठी कंपनीने आपल्या एकंदर संरचनेत एक वेगळा विभाग निर्माण केला असून त्यामध्ये विक्रीवित्त, वसुली आणि कामकाज यांसाठी समर्पित कर्मचारी पथकांचा समावेश केला आहे.

कंपनीने देशभरातील लहान शहरांमध्ये आपला विस्तार चालविला आहे. या अनुषंगाने सहा राज्यांतील शहरांमध्ये रोशनी-केंद्रित शाखांच्या उद्घाटनाची घोषणा कंपनीतर्फे आज करण्यात आली.

विशेषकरून टियर-१, टियर-२ आणि टियर-३ या श्रेणीतील शहरांच्या बाहेरील भागांत रोशनीच्या माध्यमातून परवडणारी गृहकर्जे पीएनबी हाउसिंग फायनान्स कंपनी प्रदान करीत आहे. या योजनेत विविध गरजा भागवणाऱ्या कर्जांचे प्रकार समाविष्ट आहेत. घराची खरेदीस्वतः करीत असलेले बांधकामघराचा विस्तार किंवा त्याचे नूतनीकरणभूखंड खरेदी करून त्यावर बांधकाम आणि मालमत्तेवरील तारण कर्ज अशी कर्जे रोशनी योजनेत मिळू शकतात. त्यामुळेप्रथमच एखादे कर्ज घेणारा नागरीक असो, औपचारिक स्वरुपाचे उत्पन्न नसलेला स्वयंरोजगार करणारा ग्राहक असो, १० हजार रुपये इतके कमी घरगुती उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील पगारदार असो किंवा मध्यम उत्पन्न गटातील पगारदारहे सर्वजण या कर्जांसाठी पात्र असतील.

‘पीएनबी हाऊसिंग फायनान्स’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कौसगी म्हणाले, “स्वतःच्या मालकीचे घर असावे अशी इच्छा असणाऱ्यांचे स्वप्न साकार करण्याच्या धोरणातून आम्ही हे प्रयत्न करीत आहोत. व्यक्ती आणि समाज या दोन्हींच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना देऊन त्याद्वारे सुलभ गृहकर्ज उपलब्ध करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रमाच्या अनुषंगाने देशभरातील व्यापक ग्राहकांपर्यंत आम्ही रोशनीच्या माध्यमातून पोहोचतो आहोत. येत्या तीन वर्षांत, परवडणारी गृह कर्जे आणि प्राइम कर्जे या दोन्ही कर्जांचा आमचा पोर्टफोलिओ बळकट झालेला असेल.”

सध्या १५० जिल्ह्यांमध्ये ५००हून अधिक ठिकाणी कंपनीच्या शाखा आहेत. रोशनीची सुविधा असणाऱ्या आताच्या या शाखा उघडल्यानंतर, यातील एकूण रोशनी शाखांची संख्या ८८ इतकी होणार आहे. त्यांचा आणखी विस्तार व्हावा, याकरीता कंपनी सक्रियपणे काम करीत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading