Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

आयआयएफएलचे  रोखे देणार नऊ टक्केपर्यंत परतावा

पुणे :- आयआयएफएल फायनान्स ही  ९ जून २०२३ रोजी सुरक्षित रोख्यांची सार्वजनिक विक्री सुरु करणार आहे, ज्यातून व्यवसाय आणि भांडवल वाढीच्या उद्देशाने रु.१,५०० कोटी उभारले जाणार आहेत. हे रोखे (बॉंड्स)  नऊ टक्क्यापर्यंत  परतावा आणि उच्च दर्जाची सुरक्षितता प्रदान करतील. आयआयएफएल फायनान्स एकूण रु. ३०० कोटींचे सुरक्षित रिडीम करण्यायोग्य नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (एनसीडी) रु.१२०० कोटींपर्यंतचे (एकूण रु.१५०० कोटी) ओव्हर-सबस्क्रिप्शन राखून ठेवण्यासाठी ग्रीन-शू पर्यायासह जारी करेल.

आयआयएफएल रोखे ६० महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिवर्षी  नऊ टक्केच्या  सर्वाधिक प्रभावी परतावा प्रदान करतात. हे अपरिवर्तनीय रोखे (एनसीडी) २४ महिने, ३६ महिने आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत. व्याज पेमेंटची फ्रिक्वेन्सी वार्षिक, मॅच्युरिटी आधारावर आणि ६० महिन्यांच्या कालावधीसाठी मासिक पर्यायासह उपलब्ध आहे . आयआयएफएल रोखे रु.१,०००च्या दर्शनी मूल्यावर जारी केले जातील आणि सर्व कॅटेगरींमध्ये अर्जाचा किमान आकार रु.१०,००० इतका असेल. सार्वजनिक विक्री ९ जून २०२३ रोजी सुरु होईल आणि लवकर बंद करण्याच्या पर्यायासह २२ जून २०२३ रोजी हि विक्री बंद होईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर रोख्यांचे वाटप केले जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading