16 वर्षाची अनिवासी भारतीय रिया पवार सादर करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमेरिकन राष्ट्रगीत
पुणे : 23 जून रोजी वॉशिंग्टन डी.सी. मधील रोनाल्ड रीगन बिल्डिंगमध्ये अनिवासीय आणि भारतीय वंशज (इंडियन डायस्पोरा) यांच्या कार्यक्रमादरम्यान किशोरवयीन गायकी रिया पवार गाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 21 ते 23 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 22 जून रोजी मोदींसाठी राज्य भोजनाचे आयोजन केले आहे. या भेटीत 22 जून रोजी पंतप्रधान मोदी कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. ते 23 जून रोजी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे अनिवासीय आणि भारतीय वंशज (इंडियन डायस्पोरा) नेत्यांच्या निमंत्रित मेळाव्याला संबोधित करतील. (16-year-old non-resident Indian Riya Pawar will perform the American national anthem in front of Prime Minister Narendra Modi)
ही भेट अमेरिका आणि भारत यांचे संबंध साजरे करते आज जगातील सर्वात मोठ्या दोन लोकशाही देशांमधील हे सर्वात महत्त्वाचे नाते आहे. मूळ भारतीय वंशाची अमेरिकन असणारी, रिया म्हणाली की “माझ्या अमेरिकन आणि भारतीय अस्तितवाच्या दोन्ही बाजू या निमित्ताने एकत्र आलेल्या पाहून मला खूप आनंद झाला आहे. “
मूळचे वालचंदनगर आणि पुण्याचे असणारे रियाचे आई-वडील श्रद्धा आणि राहुल पवार आणि भाऊ रिशान गेल्या अनेक वर्षापासून न्यू जर्सीमध्ये राहतात, रिया पाच वर्षाची असल्यापासून गाते आहे. ती अनेक वर्षापासून हेमंत कुळकर्णी यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. याचबरोबर ती बॉलीवुड आणि वेस्टर्न संगीतही शिकते.रियाने तिन्ही प्रकारात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिच्या गायनाव्यतिरिक्त ही एक बहु प्रतिभावान हुशार मुलगी आहे. तिने मिस इंडिया टीन न्यू जर्सी 2021 चा वि जिंकला आणि तिच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीमुळे तिला “ब्युटी विथ ब्रेन्स” असे संबोधले जाते.तिच्या पेजंट प्लॅटफॉर्मचा वापर ती मुलींमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचारकरण्यासाठी करते आणि आशा करते की अधिक मुली STEM मध्ये करिअर करण्यासा
प्रेरित होतील. पंतप्रधान मोदींसमोर राष्ट्रगीत गाण्यासाठी रिया खूप उत्सुक आहे. तीपंतप्रधानांना भेटण्यासाठी आणि भारताबद्दलच्या त्यांच्या पुढील नियोजनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. तिने दाखवून दिले आहे की लहान वयातही बऱ्याच गोष्टीसाध्य करणे शक्य आहे. रियाने अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी याआधीही अप्रतिम गायन सादर केले आहे. तिचा सुंदर आवाज आणि तिची संगीताची आवड, तिचे गाणे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करेल अशी ती आशा करते.
