Thursday, June 4, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यात मोठी आग; अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी

पुणे : शहरात पुन्हा मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. आता ही आग कोंढवा परिसरात लागली आहे. या भागात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्याजवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे. आगीमुळे धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. रविवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास लागलेली आग आहे. या आगीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे परिसरातील काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.

पुण्यात सकाळी ८.३० च्या सुमारास लागलेली आग दुपारी १२ वाजता नियंत्रणात आली. अग्निशमन दलाने आगीपूर्ण विझवली अन् कुलिंगचे काम वेगाने सुरू केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

मागील आठवड्यात लागली होती आग
पुणे शहरात काही दिवसांपूर्वी मध्यरात्री आगीच्या दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील टिंबर मार्केटमध्येही मोठी आग लागली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading