Friday, June 19, 2026
Latest NewsLIFESTYLE

जहांगीर आर्ट गॅलरी येथे “ह्यूज” ह्या समूह कला प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : सुशील मार्टिन फाउंडेशनतर्फे  “ह्यूज” या  चित्र, शिल्प आणि प्रिंट्स या माध्यमातील कलाकृतींच्या सामूहिक प्रदर्शनाचे आयोजन २० ते २६ जून २०२३ दरम्यान  जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा,  मुंबई येथे करण्यात आले आहे. 

या प्रदर्शनामध्ये  सुप्रसिद्ध कलाकार  पराग बोरसे, आशिफ होसैन, सत्यजित वरेकर, रतन साहा, प्रकाश बाळ जोशी, ओम स्वामी, विश्वजीत कुमार, विशाल साबळे, कादंबरी मेहता, अपरिमिता सप्रू, चंद्रकांत फडतरे, वर्षा बाळवणी कुकरेजा, त्राप्ती बाडजातिया, दादासाहेब यादव, पी.जे. स्टालिन, प्रिया इलंगो, प्रा. मानसिंग काटकर, अतुल भालेराव, मरेडू रामू, शशिकांत पाताडे आणि ऊर्णा दत्ता यांचा सहभाग आहे. प्रत्येक कलाकार त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक अभिव्यक्तीच्या माध्यमांमध्ये विविध कलाकृतींची प्रदर्शन करीत आहेत.  या प्रदर्शनाचे उदघाटन  २० जून २०२३ रोजी  मनोज कोटक (सांसद – नॉर्थ ईस्ट मुंबई),  कृष्णा   हेगडे  (माजी विधायक),   प्रकाश बाळ  जोशी  (प्रतिष्ठित चित्रकार),  राजीव कासट  ( प्रसिद्ध वास्तुविशारद) यांच्या उपस्थितीत संध्याकाळी ५ वाजता जहांगीर गॅलरी येथे होईल. 

 

या प्रदर्शनातील कलाकृती या नामांकित चित्रकारांच्या कलात्मक कौशल्याचे प्रतीक आहेत. चित्र, शिल्प आणि प्रिंट या माध्यमातील निसर्ग आणि मानव यांच्या जवळ जाणाऱ्या कलात्मक कलाकृती या प्रदर्शनात रसिकांना पाहता येतील. प्रदर्शनातील कलाकृतींच्या विषयांचं वैविध्य रसिकांना अचंबित करेल असेच असणार आहे. यामध्ये ऋतूंचं सौन्दर्य, प्रकृतीचे चमत्कार, जीवनातील जिवंतपणा , शहरांचं सौंदर्य, ऐतिहासिक वारसास्थळे आणि भारतीय संस्कृतीच्या विविध परंपरा अशा अनेकविध विषयावरील कलाकृती रसिकांना पाहता येतील. प्रदर्शनातील मूर्त, अमूर्त, फिगरेटीव्ह अशा विविध माध्यमातील कलाकृती रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या ठरतील हे निश्चित, त्यामुळे चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे. 

या प्रदर्शनाचे आयोजनाचा एक उद्देश हा सामाजिक बांधिलकी जपणे हा देखील आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींच्या विक्रीतील नफ्याचा काही भाग हा सुशील मार्टिन फौंडेशन संचालित गरीब मुलांसाठी चालवण्यात येणाऱ्या निरीक्षण स्कूलसाठी देणगी म्हणून देण्यात येणार आहे.  हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत खुले असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading