Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘वैद्यकीय सेवां’ची जबाबदारी विमा कंपन्यांवर टाकणे अयोग्य – काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी


पुणे : ‘वैद्यकीय सेवा’ची जबाबदारी ‘विमा कंपन्यांवर’ टाकण्याची केंद्र सरकारची वृत्ती योग्य नाही, गरिबांसाठी ‘लोकसंख्येनुसार’ वैद्यकीय सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे ही खरेतर काळाची गरज आहे. महावीर जैन समाजातर्फे वारकऱ्यांना मोफत औषधोपचार आणि मोफत औषधांचे वाटप हे मानवतावाद व सेवेचे ‘आदर्श प्रतीक’ आहे, असे वक्तव्य काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘महावीर जैन समाजातर्फे आयोजित वैद्यकीय शिबिराला भेट प्रसंगी सांगितले..!
ते पुढे म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान  इंदीरा गांधी यांनी “एक (१) हजार लोक संख्ये मागे एक (१) सरकारी बेड (खाट) ची गरज ७ व्या पंतवार्षीक योजनेच्या ऊद्दीष्टांमध्ये समाविष्ट केली होती”.. मात्र कथित नव्या भारतात “Planning Commission योजना आयोग” बरखास्त केला हे अदुरदर्शीतेचाच् परीचय आहे असे ही त्यांनी सांगीतले..!
संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पारंपारिक पालखी मंगळवार, 13 जून 2023 रोजी पुणे शहरात पदार्पण करून विसावते.. या निमित्ताने “जैन सोशल ग्रुप पुणे प्राईड, महावीर जैन मित्र मंडळ आणि हिम्मत चॅरिटेबल ट्रस्ट. वारकरी समाजातील बंधू भगिनींच्या हितासाठी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली वारकऱ्यांना त्यांच्या आरोग्यासाठी मोफत औषधोपचार व मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली..!
आरोग्य शिबीरचे निमंत्रक व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.अशोक जैन जैन सोशल ग्रुप पुणे प्राईड
महावीर जैन मित्र मंडळाचे सचिव हर्षल जैन यांनी संस्थेच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार केला..!
मंगळवार, 13 जून रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत महावीर जैन मित्र मंडळ व हिम्मत चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जैन सोशल ग्रुप पुणे प्राईड, डायबेटीस, बी.पी., दंत तपासणी आवश्यकतेनुसार मोफत वैद्यकीय उपचार व औषधे देण्यात आली. 720 वारकरी बंधू भगिनींचे झाले. या सेवा कार्यासाठी पुण्यातील 10 तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ.लुभचंदजी छाजेड, डॉ.रमेश गुंदेचा, दिलीप बोरा, डॉ.पंकज गुंडेशा, डॉ.मोहन ओसवाल, डॉ.सिद्धार्थ ओसवाल, डॉ.पी.के. ओसवाल, डॉ. निसर्ग शहा आदींनी सहकार्य केले..!
या आरोग्य शिबिरात आमदार मोहनजी जोशी, शहर काँग्रेसचे मा उपाध्यक्ष सुभाष थोरवे, जैन सोशल ग्रुपचे आंतरराष्ट्रीय संचालक बिरेन शहा, पुणे परिवार प्रमुख चंचला कुचेरिया आदींची विशेष उपस्थिती होती..!
सर्व प्रमुख पाहुण्यांचा कुंकू बदला, फळफळावळ, मोत्यांच्या माळा व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला..!
कार्यक्रमात जेएसजी ग्रुप व मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन व पदाधिकारी हर्षद चोरडिया, विनोद शहा, संजय शहा, कविताबेन शहा, विनोद पोरवाल, महेश सुराणा, सुभाष संघवी, श्रीपाल शहा, जितेंद्र जैन, विवेक राठोड, दिलीप गुंदेचा यांनी सहभाग घेतला..!
हिम्मत चॅरिटेबल ट्रस्ट 79 रविवार पेठ, कस्तुरी चौक, पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading