Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लालमहालात सलग १२ तास वारक-यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद 

पुणे : विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल… ज्ञानोबा माऊली तुकाराम चा अखंड गरज… टाळमृदगांच्या ठेक्यावर विठ्ठलाच्या नामात तल्लीन झालेला वारकरी वर्ग अशा भक्तीमय वातावरणात हरी नामाच्या गजराने लालमहाल दुमदुमुन गेला. सलग १२ तासांच्या या कीर्तन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाईंचे अभंग ऐकताना वारकरी दंग झाले. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरीला निघालेले वारकºयांनी पुण्यामध्ये विसाव्याला असताना नारदीय कीर्तनाचा भक्तीमय आनंद लुटला.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-आॅप. बँक तर्फे वै. ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले. कीर्तनमालेचे उद््घाटन लाल महालचे सुरक्षारक्षक संजय आंबवले आणि स्वच्छता कर्मचारी नीता गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते. 

यावेळी होनराज मावळे, उदय शहापूरकर, योगेश देशपांडे, मुकुंद कोंडे यांनी साथसंगत केली. अरुणकुमार बाभुळगावकर, अक्षदा इनामदार, ओंकार चिकणे, सक्षम जाधव, प्रिती यादव आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.
सकाळी कीर्तनमालेची सुरूवात ह.भ.प. श्रेयसबुवा बडवे यांच्या कीर्तनाने सुरूवात झाली.

श्रेयसबुवा बडवे म्हणाले, पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही तर भेटायचा देव आहे. मनात कोणताही हेतू न धरता एखाद्याकडे जाणे म्हणजे भेटणे. वारक-यांच्या मनात भक्तीभावा व्यतिरिक्त कोणताही हेतू नसतो. त्यामुळे ते केवळ पांडुरंगाच्या दर्शनाला नाही, भेटायला जात असतात.

ह.भ.प.मंगलमूर्ती औरंगाबादकर, ह.भ.प.वासुदेवबुवा बुरसे, ह.भ.प. वेदिका गोडबोले, ह.भ.प. रेशीम खेडकर, ह.भ.प. विकासबुवा दिग्रसकर, ह.भ.प. संगीता मावळे, ह.भ.प. उद्धवबुवा जावडेकर यांच्या कीर्तनाने वारकरी मंत्रमुग्ध झाले.

हेमंतराजे मावळे म्हणाले, वारकरी भक्तांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांसाठी सलग १२ तास अखंड नारदीय कीर्तनमालेचे आयोजन केले होते. दिवसभर मोठया संख्येने वारकरी या उपक्रमात सहभाग घेत, कीर्तन श्रवणाचा आनंद घेतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading