सोनू सूदने त्याचा आगामी चित्रपटात दिली ‘या’मुलाला संधी !
नेहमीच सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असलेला अभिनेता म्हणून सोनू सूद ओळखला जातो. लोकांच्या मदतीसाठी आजवर सोनू ने अनेक काम केली आहेत. सोनू सध्या रोडीजचा नवीन सीझन होस्ट करत आहे. MTV रोडीज सीझन 19 च्या ऑडिशन्स दरम्यान, गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील शुंभम नावाच्या स्पर्धकाने, जो श्रवण-अशक्त आहे ज्याला सोनू ने त्याचा दृढनिश्चयाने आणि चिकाटीने प्रभावित केले आहे. सोनू सूदने एक उल्लेखनीय काम करून या तरुण मुलाचे स्वप्न साकार केले आहे आणि त्याला त्याच्या होम प्रॉडक्शनमधील “फतेह” मध्ये एक खास भूमिका ऑफर केली आहे.
रोडीज मध्ये नेहमीच कठोर आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व म्हणून सोनू पुन्हा चर्चेत आला आहे पण त्याने या गोष्टीने सगळ्यांची मन जिंकली. अश्या एका मुलाला कामाची संधी देऊन त्याने त्याची अनोखी बाजू दाखवली आहे. हा शो नेहमीच वेगवेगळ्या कारणा मुळे चर्चेत आहे एकोणिसाव्या सीझनकडे वाटचाल करत असताना तो प्रेक्षकां ना अश्या गोष्टीने आश्चर्यचकित करत आहे.
किशोरने प्रामाणिकपणाने अभिनेता बनण्याची इच्छा सोनू ला सांगून सोनू च मन जिंकल. समाजाच्या भल्यासाठी नेहमीच हातभार लावणाऱ्या लोकांना अशा संधी उपलब्ध करून देत असताना सोनू यात कोणतीही कसर सोडत नाही म्हणून नेहमीच सोनू सगळ्यांची मन जिंकतो आहे.
