Thursday, June 4, 2026
BusinessLatest News

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनने बालासोर रेल्वे अपघातातील पीडितांना मदतीचा हात पुढे केला

पुणे :  पीव्हीसी-यू पाइप्स आणि फिटिंग्जची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाऊंडेशन (MMF) यांनी ओडिशा मधील बालासोर येथे अलीकडेच झालेल्या भीषण रेल्वे अपघातात प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अपघात झालेल्या जागेच्या परिस्थितीचे आकलन केल्यानंतर, कटकमधील पीडितांना आणि बाधित लोकांवर उपचार करण्यात गुंतलेल्यांना सर्वसमावेशक मदत करण्यासाठी फिनोलेक्स आणि एमएमएफ (MMF) एकत्र आले. या भागात रुग्णांची वर्दळ जास्त असल्याने अपघातग्रस्त, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक आणि सफाई कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. अन्न आणि पिण्याचे शुद्ध पाणी प्रमुख गरजा असल्याचे लक्षात आले आणि कंपनीने त्या अनुषंगाने  सहाय्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकले. फाऊंडेशन कटक रुग्णालय आणि प्रदेशाबाहेरील ट्राउमा सेंटरमधील गरजू लोकांपर्यंत पोहोचले. स्थानिक स्त्रोतांच्या मार्फत खाद्य पदार्थ आणि जेवणाची सोय करणे या स्वरूपात अजूनही मदत कार्य चालू आहे.

हा सहभागीदारीतील एकत्र येऊन केलेला प्रयत्न संकटाच्या वेळी सार्वजनिक व खासगी भागीदारी आणि समाजाच्या सहभागाचे महत्व दर्शवतो. बाधित लोकांच्या तत्काळ गरजा पूर्ण करून फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाऊंडेशन (MMF) सकारात्मक प्रभाव पडत आहेत आणि समाजासमोरील आव्हाने दूर करण्यास मदत करत आहेत.

देशाला मूळापासून हदारवून टाकणाऱ्या या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुकुल माधव फाऊंडेशन (MMF)च्या व्यवस्थापकीय विश्वस्त सुश्री. रितु छाबरिया म्हणाल्या की, “या विनाशकारी शोकांतिकेमुळे ज्या लोकांचे नुकसान झाले त्यांच्याबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करते. या संकटाला तोंड देण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी आलेल्या   टीम्स, त्यांचे अथक परिश्रम व त्यांच्यातील माणुसकी पाहणे हे भारावून टाकणारे आहे. संकटाच्या वेळी नेहमी पुढे येऊन मदत करणारी एक परिसंस्था असणे हा एक सन्मान आहे.”

  मागील काळात एमएमएफ (MMF) ने चक्रीवादळ, पूर, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पीडितांना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे आणि कोविड बाधितांना देखील मदत केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading