Friday, October 16, 2026
BusinessLatest News

वी मुळे वारकऱ्यांना पुणे ते पंढरपूर २५० किलोमीटरच्या, २१ दिवसांच्या वारीमध्ये आपल्या प्रियजनांसोबत कनेक्टेड राहता येणार

सफेद गांधी टोप्या, रंगीबेरंगी साड्यांची जणू एक विशाल नदी, विठूनामाचा अखंड गजर करत, घाट, खडबडीत रस्ते आणि हवामानाच्या अडीअडचणींवर मात करत पंढरपूरच्या दिशेने धाव घेत असते. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत विठुरायाच्या भक्तीचा आगळावेगळा सोहळा म्हणजेच पंढरपूरची वारी संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात प्रभावी भक्तियात्रांपैकी एक आहे. तब्बल तीन आठवडे पायी चालत, एकतारी, ढोलकी आणि टाळ चिपळ्यांच्या तालात तल्लीन होऊन, पांडुरंगाचे नामस्मरण करत वारकरी पंढरपूरला जाऊन देवाचे दर्शन घेऊन धन्य होतात.

वारकऱ्यांच्या आध्यात्मिक अनुभवात वृद्धी व्हावी, त्यांना वारीच्या संपूर्ण काळात आपल्या प्रियजनांसोबत कनेक्टेड राहता यावे यासाठी भारतातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार वी ने दोन मल्टी-युटिलिटी मोबाईल व्हॅन्स तैनात केल्या आहेत. पुणे ते पंढरपूर, २५० किलोमीटरच्या २१ दिवसांच्या प्रवासात या व्हॅन्स वारकऱ्यांसोबत राहतील. त्यानंतर या व्हॅन्स आषाढी एकादशीच्या काळात ३ दिवस पंढरपूर शहरात राहतील.

अखंडित कनेक्टिविटीची सुविधा वारकऱ्यांना सतत मिळत राहावी यासाठी या मोबाईल व्हॅन्समध्ये १०० पेक्षा जास्त मोबाईल फोन चार्जिंग पॉईंट्स, निःशुल्क कॉलिंग सुविधा आणि रिचार्ज सेवा असणार आहेत. वारकऱ्यांना संपूर्ण दिवसभर या सुविधांचा उपयोग करून घेता येईल. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसोबत या व्हॅन्स देखील चालत राहतील.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड  रोहित टंडन यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखींच्या विश्वस्तांनी आज पुण्यामध्ये वी मोबाईल मल्टी युटिलिटी व्हॅन्सचे उदघाटन केले.

वोडाफोन आयडियाचे महाराष्ट्र आणि गोव्याचे क्लस्टर बिझनेस हेड  रोहित टंडन यांनी यावेळी सांगितले, “महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या पंढरपूर वारीमध्ये यंदा वी देखील प्रत्यक्ष सहभागी होणार याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. दरवर्षीच्या वारीमध्ये राज्यभरातील अनेक शहरे आणि गावे श्री पांडुरंगाच्या भक्तीमध्ये एकत्र येतात. वारकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात अखंडित वी नेटवर्कचा अनुभव घेता यावा यासाठी दोन्ही पालखी मार्गांवर आम्ही अतिरिक्त क्षमता तैनात केल्या आहेत आणि आमचे नेटवर्क ऑप्टिमाइज केले आहे. आमच्या वी मोबाईल व्हॅन्समध्ये मोबाईल चार्जिंग सुविधा, निःशुल्क कॉलिंग उपलब्ध करवून दिले जाईल.  वी ऍपमधील पांडुरंगाचे अभंग, आरत्या, कीर्तनांच्या विशाल कलेक्शनचा लाईव्ह डेमो दाखवला जाईल.” 

विठुरायाचे २४० पेक्षा जास्त अभंग, आरत्या आणि कीर्तने वी ऍपवर उपलब्ध आहेत, भाविक त्यांचा लाभ कधीही, कुठेही घेऊ शकतात. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading