Thursday, June 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Monsoon update : मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन

पुणे :  आज (11 जून) राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढच्या 4, 5 दिवसात (Thunderstorms with gusty winds & rains) मेघागर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज नैऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी येथे मान्सून दाखल झाला आहे. यामुळे पुणे शहर आणि उपनगरात गडगडाटाच्या शक्यतेसह आकाशात अंशतः ढगाळ वातावरण तयार झाले आहे. तसेच वादळी वारे 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. अधूनमधून शहर आणि उपनगरांमध्ये उष्ण ते दमट स्थिती राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, दक्षिण कोकणातील काही भागांसाह दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक व तामीळनाडू व आंध्रप्रदेशचा‌ काही भाग देखील मान्सूनने व्यापला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading