Wednesday, September 2, 2026
Latest NewsPUNE

जनतेस दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यानेच् सत्ताधाऱ्यांचा ‘धार्मिक ध्रुवीकरणाचा’ प्रयत्न – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांची टीका


पुणे : जनतेस दिलेले ‘एक ही आश्वासन पूर्ण करू न शकल्यानेच’ धार्मिकतेचा आधार घेण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आली आहे. त्यामुळे राज्यात धार्मिक ध्रुवीकरण करण्याची कारस्थाने सत्ताधारी भाजप करीत असल्यामुळे, धार्मिक – जातीय दंगली घडत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते गोपाळदादा तिवारी यांनी शनिवारी केला.
राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने ५ जून ते १९ जून या कालावधीमध्ये पुणे शहरात “सामाजिक सलोखा आणि सद्भावना पंधरवडा” साजरा केला जात आहे. ४ यशस्वी नागरी-बैठका नंतरची आज ची ५ वी कॅार्नर मिटींग येरवडा-शांती नगर मध्ये झाली..!
यानिमित्त शहरातील विविध भागांत, वस्त्या व सोसायटी येथे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
येरवडा येथील शांतीनगरमध्ये शनिवार दि १० रोजी, सामाजिक सलोखा – कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.. अध्यक्ष स्थानी ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट होते.
गोपाळदादा तिवारी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सध्या राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. अनेक ठिकाणी दंगली घडवल्या जात आहेत. भाजपा आ. नितेश राणे पुण्यात येऊन लव्ह जिहादच्या नावावर मोर्चे काढून परिस्थिती बिघडवण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात लोकांमधील भीतेचे वातावरण कमी व्हावे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. खरेखर लव्ह जिहाद वा कोणत्याही धर्मिय महीला अत्याचाराच्या पिडीत भगीनी आहेत काय(?) याची माहीती आम्ही घेत आहोत व आढळल्यास सर्वतोपरी कायदेशीर सुरक्षा व सहकार्य देखील स्मारक समिती देणार असल्याचे सांगतीले..
ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट म्हणाले, सध्या भाजपच सत्तेवर असताना हिंदू धोक्यात कसे आले आहेत. भाजप सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाही हे यातून स्पष्ट होत आहे. कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने असाच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ही दंगली घडवण्याचे प्रयत्न त्यांच्यावरच उलटणार आहेत.
प्रभाग अध्यक्ष डॉ. रमाकांत साठे म्हणाले, काँग्रेस नेते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी तत्कालीन विरोधीपक्ष नेते स्व अटलजींना दिलेली वागणुक, सन्मान व राजकीय संस्कारांचा बोध खरेतर मोदींनी घेण्याची गरज आहे.
जेष्ठ पत्रकार दीपक जाधव यांनी सांगितले, राज्यात महागाई, बेरोजगारी, आरोग्य असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडून लोकांना आपापसात भांडायला लावले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे.
युक्रांद चे उपाध्यक्ष संदीप बर्वे म्हणाले, लोकांनी आता एकजूट करून सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध उभे राहायला हवे. राजीव गांधी स्मारक समितीचा सामाजिक सलोखा पंधरवडा साजरा करण्याचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून अशा कार्यक्रमांची सध्या खूप गरज असल्याचे संदीप बर्वे यांनी सांगितले.
लोकांना ‘केरला स्टोरी’ चित्रपटाची तिकिटे मोफत वाटून त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जनतेस आता खरे-खोटे समजायला लागले असून ते खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असे वक्तव्य महीला ब्लॅाक अध्यक्षा सौ शिवानी माने यांनी केले. या कॅार्नर मिटींगचे संयोजन वॅार्ड अध्यक्ष सचिन भोसले व सहकाऱ्यांनी केले.
या प्रसंगी स्मारक समिती सदस्य सर्वश्री भाऊ शेढगे, विकास दवे, सुरेश ऊकीरंडे, विनायक पाटील, निलम पंडीत, नरेश आवटे
डॅनिअल अण्णा मगर, धम्मक्रांती बौद्ध संघाचे अध्यक्ष भीमराव वानखेडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश गंगावणे, महिला कार्यकर्त्या शोभा शिंदे आदींसह स्थानिक परीसरातील नागरीक उपस्थित होते.. सेलवराज अंथोनी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading