Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

७० वर्षे सामाजिक सलोखा जोपासत आलेल्या भारताचे ‘सामाजिक स्वास्थ्य’ नासवण्याचे पाप भाजपने अमृतकाळात करू नये – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

पुणे : प्रचंड महागाई, संविधानिक भ्रष्टाचार, राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास, देशावरील वाढते कर्ज, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती गरीबी व कुपोषणाने जर्जर झालेल्या भारताचा आंतरराष्ट्रीय हॅपी इंडेक्स, लोकशाही इंडेक्स खालावला आहे. मात्र सत्ताधारी भाजप ‘नवा भारत’च्या नावा खाली स्वतःच ढोल बडवत आहे. अशा परिस्थितीत देशातील समस्यांचा निपटारा करू न शकलेले सत्ताधारी भाजप देश अस्थिर करू पहात आहे. राज्यात जाणीव पुर्वक धार्मिक विद्वेष वाढवण्याचे निंद्य प्रयत्न करीत सत्ताधीश भाजप करत असून, ७० वर्षे सामाजिक सलोखा जोपासत आलेल्या भारताचे ‘सामाजिक स्वास्थ्य’ नासवण्याचे पाप मात्र भाजप तथाकथित अमृतकाळात करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!

राजीव गांधी स्मारक समिती तर्फे “प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जन्मदिन ५ जुन ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जन्मदिन १९ जुन” हा पुणे शहरात सदभावना व सामाजिक सलोखा पंधरवड्यातील आज ४ थी बैठक (कॅार्नर मिटींग) एरंडवणे, शिवाजी नगर येथील स्वीकार हॅाटेल कट्टा येथे पार पडली..!
या बैठकीचे निमंत्रक, स्मारक समिती सदस्य ॲड संदिप ताम्हणकर यांनी प्रास्ताविकात, आपले संविधानिक हक्क हे शहिष्णुता, धर्मनिरपेक्षता आणि समानता असल्याने, यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून विद्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.
सध्याच्या काळात मतपरिवर्तन आणि मन परिवर्तनासाठी महात्मा गांधीजींचा सत्य-अहिंसेचा मार्गच् वापरला जावा द्वेषपूर्ण आणि द्वेषपूर्ण भाषा वापरू नये असे विचार युक्रांद च्या ॲड आरती देशमुख यांनी व्यक्त केले.
किशोर सरदेसाई यांनी प्रदीप कुरुलकर या देशद्रोही माणसाचा बॅनर लावून.. देश के गद्दारों को.. गोली मारो सालो को..! या स्वरूपाचे जहाल आंदोलन केले पाहिजे विचार व्यक्त केले..!
आजच्या कार्यक्रमाला युवक क्रांती दलाच्या ऍड आरती देशमुख जेष्ठ काँग्रेसजन अशोक जी धारिया, आंबेडकर विचाराचे श्री किशोर सरदेसाई आणि उद्योजक गणेश फासे, आण्णा गोसावी यांची भाषणे झाली..
या प्रसंगी सुर्यकांत मारणे, सुभाष थोरवे, भाऊ शेडगे, भोला वांजळे, ॲड श्रीकांत पाटील, धनंजय भिलारे, विनायक पाटील, सुरेश ऊकीरंडे इ राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य कार्यकर्ते असे अनेक मान्यवर उपस्थित होते..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading