Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

इंडेल मनीची महाराष्ट्रात कार्यविस्ताराची योजना

पुणे : इंडेल कॉर्पोरेशनची प्रमुख कंपनी आणि सोने तारण कर्ज क्षेत्रातील आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) असलेल्या इंडेल मनीने, तिच्या राष्ट्रीय विस्तार योजनेचा एक भाग म्हणून पश्चिम आणि मध्य भारतातील उपस्थिती मजबूत करण्याची योजना आखली आहे.

सध्या महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, पुडुचेरी आणि केरळ सारख्या ८ राज्यांमध्ये इंडेल मनी तिच्या २५० पेक्षा जास्त शाखांद्वारे कार्यरत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये नवीन १०५ शाखा उघडून संपूर्ण भारतात आक्रमकपणे कार्यविस्तार कंपनी राबवत आहे. यामध्ये महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील नवीन ४५ शाखांचा समावेश आहे. .

महाराष्ट्रात, इंडेल मनी मुंबई, नाशिक, पुणे आणि नागपूरसह इतर ठिकाणी १५ शाखा उघडण्याची योजना आखत आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत सरलेल्या २०२२-२३ मध्ये, इंडेल मनीने कर्ज वितरणामध्ये २५० टक्क्यांहून अधिक अभूतपूर्व वाढ नोंदवली. कंपनीने मासिक सरासरी २५० कोटी रुपयांप्रमाणे आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे ३,००० कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. या तुलनेत आधीच्य २०२१-२२ मध्ये तिचे कर्ज वितरण १,०५० कोटी रुपयांचे होते. कंपनीच्या एकूण कर्ज वितरणात ९२ टक्के भाग हा सोने तारण कर्जाने व्यापलेला आहे.

एकट्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, इंडेल मनीची एकूण गंगाजळी ६६९ कोटींवरून १,१५४ कोटी रुपयांवर म्हणजेच ७२ टक्क्यांनी वाढली आहे आणि नफा तब्बल ६.३ पटीने वाढून ४.९ कोटींवरून ३१.२९ कोटी रुपये झाला आहे.

नियोजित विस्ताराविषयी भाष्य करताना, इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उमेश मोहनन म्हणाले, विस्ताराच्या या टप्प्यासह, आम्ही आमच्या ग्राहक संख्येमध्ये आणि व्यवस्थापना- खालील मालमत्तेमध्ये (एयूएम) मजबूत वाढीची अपेक्षा करत आहोत. आमच्या महत्त्वाकांक्षी दीर्घकालीन वाढीच्या धोरणाचा एक भाग म्हणून, आम्ही पूर्ण भारताला व्यापणारी वित्तीय सेवा कंपनी म्हणून उदयास येण्यासाठी संपूर्ण देशभरात आमच्या कामकाजाचा विस्तार करण्यासाठी जैविक आणि अजैविक अशा दोन्ही संधी शोधत आहोत.

कंपनीने प्रत्येकी १,००० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक प्रस्तुतीचा तिसरा टप्पा (६ जून ते १९ जून २०२३ पर्यंत) खुला केला आहे. या रोखे विक्रीतून एकूण १०० कोटी रुपयांपर्यंत निधी मिळविला जाईल आणि गुंतवणूकदारांना दरवर्षी १२.२५ टक्क्यांच्या कूपन दराने परतावा दिला जाईल. यापूर्वी २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये बाजारात आलेल्या पहिल्या दोन टप्प्यांतील रोख्यांना प्रत्येकी १६९ टक्के भरणा करणारा प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळवला आहे.

पतमानांकन संस्था क्रिसिलने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी इंडेल मनीला बीबीबी+ स्थिर असे उंचावलेले मानांकन बहाल केले आहे. अलीकडेच, इंडेल मनीने बीएफएसआय लीडरशिप समिट अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘फास्टेस्ट ग्रोइंग एनबीएफसी ऑफ द इयर’ पुरस्कार पटकावला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading