Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

आठवणींना उजाळा देत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची जयंती साजरी  

‘नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न 

पुणे : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी तयार केलेल्या पहिल्या भारतीय बनावटीच्या कॅमेरा पासून ते लोकमान्य टिळकांनी त्यांना दिलेल्या ‘सिनेमा केसरी’ या उपाधी पर्यंत, तसेच भारतीय चित्रपटांसाठी सुरू झालेल्या सेन्सॉर बोर्डपासून बोलपटांपर्यंत बाबुराव पेंटर यांचे भारतीय चित्रपट सृष्टीतील बहुमूल्य योगदानाच्या आठवणींना उजाळा देत  कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची 133 वी  जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. 

निमित्त होते, कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने आजोजित कलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती सोहळा व नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023 या स्पर्धेचे.  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे  झालेल्या या सोहळ्यात कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची कन्या विजयमाला पेंटर, आशालता पेंटर, सून अनुराधा मेस्त्री, नातू अर्जुन मेस्त्री, नात प्रिया बॅनर्जी, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, वीणा चारी, मानसिंग टाकळकर आदी उपस्थित होते.  यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर आर्ट फाउंडेशनच्या वतीने फाईन आर्टसचे  विद्यार्थी व चित्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या वेबसाईटचे अनावरण देखील करण्यात आले. तसेच नॅशनल लेवल आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन 2023 या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. या राष्ट्रीय  स्पर्धेचे परीक्षक  म्हणून ज्येष्ठ चित्रकार संजय शेलार, दत्तात्रय पांडेकर  यांनी काम पाहिले.

दरम्यान, या आर्टवर्क एक्झिबिशन अँड कॉम्पिटिशन मध्ये संपूर्ण भारतातून 500 हुन अधिक व्यावसायिक कलाकार व कला शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले असून हे  प्रदर्शन 4 जून पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन येथे सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत नागरिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.  

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –

विद्यार्थी विभाग 

कॉनटेंप्ररी   = प्रथम क्रमांक – मोहनदास चव्हाण, द्वितीय -पितरूस दराईक, तृतीय – हिमांशी चौधरी 

पोर्टेट = प्रथम – कुसुमावती हिरा, द्वितीय – सुप्रिया सुतार, तृतीय – अनिकेत देवगिरीकर 

लॅंडस्केप = प्रथम – आश्विन खापरे, द्वितीय – सचिन बने, तृतीय – अनिकेत देवगिरीकर

व्यावसायिक विभाग 

कॉनटेंप्ररी = प्रथम – आम्रपाली जाधव, द्वितीय – प्रताप मन्ना, तृतीय – हेमंत ढाणे

पोर्टेट = प्रथम – संदेश मोरे, द्वितीय – सिद्धार्थ गावडे, तृतीय – राजेंद्र दीक्षित 

लॅंडस्केप = प्रथम – सिद्धेश कणसे, द्वितीय -विक्रांत शितोळे, तृतीय – गजानन शेळके

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading