fbpx

श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवजयंतीचे आयोजन


पुणे :कसबा पेठेतील श्री कसबा गणपती चौक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर,स्थायी समिती चे माजी अध्यक्ष हेमंत रासने माजी नगरसेवक योगेश समेळ,स्वराज्य शिलेदारांचे वंशज श्री समीर पोतनीस ,कसबा भा ज प चे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,राष्ट्रवादी चे अध्यक्ष गणेश नलावड श्री कसबा गणपती चौक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष महेश मोळावडे मुख्य विश्वस्त पुष्कर तुळजापूरकर जतीन पांडे आदी उपस्थित होते ह्यावेळी शिवचरित्रावर आधारित गड आला पण सिंह गेला हा जिवंत देखावा १००कलाकारांनी साकारला
यावेळी बोलताना आमदार धंगेकर यांनी शिवजयंती हा संस्कार आहे मी गेली तीस वर्षे हा संस्कार जोपासला आहे या मंडळाचे काम खूप उत्कृष्ट आहे रासने म्हणाले मी स्वतः गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे त्यामुळे गणेशोत्सव शिवजयंती हे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे राजकारण निवडणुकीत केले जाते पण निवडणूक संपल्यावर समाजकारण करायचे हीच आमची शिकवण आहे आणि त्या नुसार आमचे काम असते
यावेळी बोलताना महेश मोळावडे यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती दिली आभार पुष्कर तुळजापूरकर यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी केले

Leave a Reply

%d bloggers like this: