fbpx

Facebook ब्लू टिक साठी पैसे मोजावे लागणार

वॉशिंग्टन : ट्विटरप्रमाणेच आता फेसबुकनेही आपल्या ग्राहकांसाठी व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा आणली आहे. फेसबुकचे सहसंस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच ग्राहकांना ब्लू टिक सेवेसाठी फेसबुकला पैसे द्यावे लागतील.

रविवारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे सबस्क्रिप्शन सेवेची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या आठवड्यात आम्ही मेटा व्हेरिफाईड लॉन्च करत आहोत. जेणेकरून सबस्क्रिप्शन सेवा तुमचे सरकारी आयडी व्हेरिफाईड करून सुरू करू शकाल. झुकरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार आता ग्राहकांना ब्लू टिक आणि बनावट खात्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी थेट या सेवेचा लाभ घेऊ शकतात. ते म्हणाले की, हे नवीन फीचर फेसबुकच्या सेवांमध्ये प्रमाणीकरण सुरक्षा वाढविण्याबाबत आहे.

मेटा व्हेरिफाईड सेवेची घोषणा करताना झुकरबर्ग यांनी युजर्सना किती रक्कम खर्च करावी लागेल, हे देखील सांगितले आहे. झुकरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार वेब-आधारित व्हेरीफिकेशनसाठी युजर्सला दर महिन्याला ११.९९ डॉलर्स ( ९९२ रुपये) आणि ओएसवरील सेवेसाठी १४.९९ डॉलर्स (१२४० रुपये) दरमहा द्यावे लागतील.

मार्क झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार मेटा व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन सेवा या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसाठी सुरू केली जाईल. लवकरच ही सेवा इतर देशांसाठीही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकची ही सेवा भारतात कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: