Tuesday, July 7, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार वाढ


नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचा-यांचा पगार लवकरच वाढणार आहे. डीए वाढीबाबत सरकार काही दिवसांत निर्णय घेणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढणार असून पेन्शनधारकांची महागाईतून सुटका होणार आहे.

कोरोनाचा काळ वगळता मागील कल पाहता सरकार होळीपूर्वी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डीए वाढवण्याचा निर्णय येत्या १५ दिवसांत येऊ शकतो. पुढील महिन्यात १ मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत डीए वाढीला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. महागाई पाहता उद्योगक्षेत्रातील कामगारांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

महागाई किती वाढली आहे हे पाहून केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या भत्त्यात वाढ करण्यात येत असते. महागाई जितकी जास्त तितका डीए वाढतो. ही उद्योगक्षेत्रातील कामगारांसाठी किरकोळ महागाई आहे. उद्योगक्षेत्रातील कामगारांच्या किरकोळ महागाईचा विचार करता यावेळी डीए ४.२३ टक्क्यांनी वाढला पाहिजे. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार सरकार दशांश बिंदूनंतरच्या संख्येकडे दुर्लक्ष करते. अशा स्थितीत यावेळी डीएमध्ये ४ टक्के वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचा-यांचा डीए ३८ टक्के आहे. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर ते ४२ टक्के होईल.

जर एखाद्या केंद्रीय कर्मचा-याचे मूळ वेतन सध्या १८,००० रुपये प्रति महिना असेल, तर ३८ टक्के डीएनुसार त्याला ६,८४० रुपये महागाई भत्ता मिळत आहे. यावेळी महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढू शकतो. १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर ते ७० रुपये होईल. अशाप्रकारे डीए वाढल्यानंतर १८,००० रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचा-याला ७,५६० रुपये महागाई भत्ता मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading